• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!

July 22, 2026 by admin Leave a Comment


Ayesha Khan Detained : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची देशभरात चर्चा आहे. नीट पेपरफुटीच्या विरोधात दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर तरुण सीजेपीच्या नेतृत्त्वात एकवटले आहेत. आम्हाला केंद्रीय शिक्षणंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवाय, अशी मागणी या आंदोलकांची आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात आंदोलक सीजेपीच्या समर्थनार्थ जमा झाले होते. यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याच आंदोलनात प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान सहभागी झाली होती. तिला पोलिसांनी ताब्यात घेतले.

नेमकं काय घडलं?

आयेशा खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. ती काळे कपडे परिधान करून शिवाजी पार्कमधील आंदोलनात सामील होण्यासाठी आली होती. थोड्याच वेळात हे आंदोलन सुरू होणार होते. त्यापूर्वी आयेशा खान रस्त्यावर उभी होती. त्याच वेळी पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि बळजबरीने तिला पोलिस व्हॅनमध्ये नेण्यात आलं. आयेशाने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर पोलिसांच्या या कारवाईचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसेच पोलिसांनी व्हॅनमध्ये नेल्यानंतही मी कोणतेही नारे देत नव्हते. मी फक्त उभी होती, असे सांगत माझ्यावर पोलिसांनी बळजबरीने मला ताब्यात घेतलं आहे, असा आरोप करणारा व्हिडीओ तिने अपलोड केला आहे.

आम्ही तिथे फक्त उभे होतो

काही वेळानंतर आयेशाला वरळी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिथे गेल्यावरही तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. आज आम्ही आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेलो होतो. आम्ही तिथे फक्त उभे होतो. रस्त्यावर आम्ही आलोच होतो. नारेबाजी सुरूही झाली नव्हती. त्याचवेळी एक अधिकारी आला आणि तुम्ही आंदोलन करू शकत नाही, असे सांगितले. त्यानंतर मग आंदोलनाचा वेगळा मार्ग काय असू शकतो, असं मी त्यांना विचारलं. नंतर लगेच त्यांनी माझ्या भावाला खेचलं, माझ्या मित्रांनाही त्यांनी व्हॅनमध्ये खेचलं, अशी हकिकत आयेशाने सांगितले.
Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!

वरळी पोलिसांचे मानले आभार

दरम्यान, आयेशावर करण्यात आलेल्या कारवाईचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. कमेंटच्या माध्यमातून तिला नेटकरी पाठिंबा देत आहेत. वरळी पोलीस ठाण्यात आल्यावर तेथील पोलिसांनी मला खूप चांगली वागणूक दिली, असेही ती सांगायला विसरली नाही.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in