फिफा विश्वचषकात स्पेनच्या तरुण संघाची कामगिरी इतकी प्रभावी होती की शेवटी फिफा विश्वचषकाच्या ट्रॉफीवर नाव कोरलेच. आपला शेवटचा विश्वचषक खेळणाऱ्या मेस्सीच्या डोळ्यात अश्रू होते. दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकून स्पेन फुटबॉल विश्वाच्या शिखरावर पोहोचला आहे. फेरान टोरेसने या विश्वचषकातील आपला पहिला गोल केला, जो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोल मानला जातो. या गोलमुळे स्पेनने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात […]
CJP ला प्रकाश राज – शाबाना आझमी यांचा भक्कम पाठिंबा, म्हणाले, ‘आज रात्री आम्ही…’
संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार म्हणजे आजपासून रोजी सुरू होत असून 13 ऑगस्ट 2026 पर्यंत चालणार आहे. तर, दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टीने मोर्चा काढण्याची तयारी केली आहे. 20 जुलै रोजी निघणाऱ्या मोर्चासाठी मोठ्या संख्येने लोक जंतर – मंतर येथे पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. एवढंच नाही तर, लोकांचा आकडा वाढण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. रविवारी देखील […]
Kalyan Crime : अनेक दिवसांपासून घरातून येत होती दुर्गंधी, बंद फ्लॅटचं दार उघडताच अंगावर शहारा; कल्याणच्या सोसायटीत काय घडलं?
कल्याण पूर्वेतील अडवली-ढोकळी परिसरातील नीलकंठ सोसायटीमध्ये सोमवारी सकाळी अत्यंत धक्कादायक हत्याकांड उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. एका फ्लॅटमध्ये तुकडे करून गोणीत भरून ठेवलेला मृतदेह पोलिसांना आढळून आला. या भीषण घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कल्याण पुर्वेच्या नीळकंठ सोसायटीत घडलेल्या या प्रकरामुळे नागरिक अतिशय भयग्रस्त असून ते जीव मुठीत धरून जगत आहेत. […]
मी आमरण उपोषण मागे घेण्यास आजच तयार, पण.. सोनम वांगचुक यांनी थेट ठेवल्या या 3 अटी..
दिल्लीतील जंतरमंतर येथे सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरू होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी सफदरचंद रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो यांनी काही गंभीर आरोप केले. यासोबतच त्यांनी कोर्टात याचिका दाखल करत इतरत्र उपचारासाठी सोनम वांगचुक यांना हलवण्याची परवानगी कोर्टाकडे मागितली. सध्या सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. यासंदर्भात रुग्णालयाकडून अधिकृत मेडिकल […]
Dhananjay Munde : ‘घटना घडली की पावती माझ्याच नावावर’, बऱ्याच दिवसांपासून मनात साचलेलं सगळं धनंजय मुंडेंनी बोलून दाखवलं
आमदार धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याच्या राजकारणातील मोठं प्रस्थ आहे. पण संतोष देशमुख हत्याकांडानंतर धनंजय मुंडे यांच्या राजकीय अडचणी वाढल्या. त्यांच्यावर बरेच आरोप झाले. धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीमामा द्यावा लागला. तेव्हापासून राजकारणात धनंजय मुंडे यांची पिछेहाट सुरु आहे. धनंजय मुंडे पुन्हा मंत्री कधी होणार? याची राजकीय वर्तुळात अनेकदा चर्चा होते. पण सध्या तशी काही […]
Ferran Torres Story: कोण आहे फोरेन टोरेस? FIFA वर्ल्ड कपच्या फायलनमध्ये एका गोलने स्पेनला बनवलं चॅम्पियन
फिफा वर्ल्डकप 2026 च्या फायनलमध्ये स्पेनचा डंका पाहायला मिळाला. न्यू जर्सीच्या मेटलाइफ स्टेडियममध्ये रविवारी रात्री झालेल्या सामन्यात स्पेनने अर्जेटिनाला 1-0 ने पराभूत करून फुटबॉलचा सर्वात मोठा किताब जिंकला आहे. या संपूर्ण सामन्यात 90 मिनिटात कोणताही गोल झाला नव्हता. परंतु अतिरिक्त वेळेत संपूर्ण सामना फिरला आहे. स्पेनच्या खेळाचं सर्वत्र कौतुक होत आहे. सामन्यात 106 व्या मिनिटाला […]