• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Attack On Aramco : वाईट बातमी, जगातल्या सर्वात मोठ्या तेल कंपनीवर मिसाइल हल्ला, अमेरिकेची एअर डिफेन्स सिस्टिम फेल

July 25, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका-इराण युद्धामुळे मध्यपूर्वेतील वातावरण आधीच तापलेलं आहे. या दरम्यान जगातली सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोवर हल्ला झाला आहे. सौदी अरेबिया आज सकाळी मिसाइल आणि ड्रोन हल्ल्याने हादरला. अमेरिकेची एअर डिफेन्स सिस्टिम हे हल्ले रोखण्यात अपयशी ठरली. सौदी अरेबियाच्या जिजान औद्योगिक शहरात स्फोटाचे आवाज ऐकू आले. जिजानमधील सौदीच्या एका महत्वाच्या केंद्राला मिसाइल हल्ल्यामध्ये टार्गेट करण्यात आलं. या हल्ल्यामुळे जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीला धोका निर्माण झाला आहे. हल्ल्यानंतर अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येमेनमधून हा हल्ला करण्यात आला. त्यांनी अरामकोशी संबंधित तेल सुविधा केंद्राला टार्गेट केलं. येमेनमधून सौदी अरेबियाच्या जिजान, यानबू आणि दमाद भागावर हल्ले झाले. सौदी सिविल डिफेन्स फोर्सने यानबू प्रांतासाठी आपातकालीन अलर्ट जारी केला आहे.

अरामको ही जगातील सर्वात मोठी तेल कंपनी आहे. यात नेमकं किती नुकसान झालय ते समोर आलेलं नाही. त्यामुळे जगातील अनेक देशांची चिंता नक्कीच वाढली असणार. कारण याचा थेट परिणाम तेल पुरठव्यावर आणि किंमती वाढण्यावर होऊ शकतो. अमेरिका-इराण मध्ये युद्ध सुरु असतानाच सौदी अरेबिया आणि येमेनमधील हूती बंडखोरांमधील तणावाने सुद्धा टोक गाठलं आहे. शुक्रवारी रात्री सौदी अरेबियाने येमेनमधील हुतींच्या नियंत्रणाखाली असलेल्या होदेइदा शहरावर हल्ला केलेला. हूतीच्या परराष्ट्र मंत्रालयाने इशारा दिलेला की, हा हल्ला सौदी अरेबियाला महाग पडेल. आम्ही याचं उत्तर देऊ. त्यांनी तसचं केलं. हूतीशी संबंधित अल मसीरा टीव्हीनुसार सौदीने होदेइदामधील दूरसंचार प्राधिकरण सुविधेला टार्गेट केलं. कमरान बेटावर सुद्धा हल्ले केलेल. यात एक महिला जखमी झाली.

जागतिक व्यापाराची चिंता वाढली

लाल समुद्रात सौदीच्या तेल टँकर्सना ड्रोन आणि मिसाइलने टार्गेट केल्याचा दावा बुधवारी हुतीने केला होता. यात एका जहाजाचं नुकसान झालेलं. 20 जुलैला जाहीर केलेल्या नाकेबंदीतंर्गत हूतीने ही कारवाई केलेली. सना विमातनळावरील हल्ल्याला हे प्रत्युत्तर होतं. सौदी समर्थित सरकारने विमानतळावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली. दोन्ही बाजूंमध्ये 2022 पासून असलेला शांतता करार आता मोडताना दिसतोय. लाल सागर मार्गावरील जागतिक व्यापाराची चिंता वाढली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in