• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Astrology: इच्छा असूनही घर आणि गाडी घेण्यात अडचण येत आहे का? ज्योतिषशास्त्रात हे ग्रह ठरतात कारण

June 3, 2026 by admin Leave a Comment


आयुष्य जगताना आपल्याकडे लक्झरी वस्तू असावं असं कोणाला वाटत नाही. प्रत्येकाच्या मनात घर आणि गाडी असावी असं वाटतं. कारण आरामात राहण्यासाठी आणि फिरण्यासाठी या दोन्ही गोष्टींची गरज असते. पण प्रत्येकाच्या नशिबी या गोष्टी असतात असं नाही. काही जणांचं आयुष्य संपून जातं पण पदरात काहीच पडत नाही. अनेक जण या गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. पण कसोशीने प्रयत्न करूनही हात काही पडत नाही. असं असताना प्रसिद्ध ज्योतिषी डॉ. बसवराज गुरूजी यांनी या मागचं कारण सांगितलं. यासाठी त्यांनी एक उदाहरणही दिलं आहे. ज्योतिषशास्त्रात मनुष्याला आशावादी प्राणी संबोधलं गेलं आहे. ऋणानुबन्धरूपेण पशुपत्नीसुतालयाः। ऋणक्षये क्षयं यान्ति तत्र का परिदेवना॥ या श्लोकानुसार, आपल्या आयुष्यात पशू, पत्नी, मुलं आणि घर असते. ते मागच्या जन्माच्या प्रारब्धानुसार मिळते. मागच्या जन्माचा हिशेब केल्यानंतर या जन्मात काय मिळणार हे ठरतं. त्यामुळे मिळालं नाही म्हणून दु:ख बाळगू नये.

शुक्र आणि मंगळ कमकुवत असल्यास…

ज्योतिषी डॉ. बसवराज गुरूजी यांच्या मते, काही लोकांकडे घर आणि गाडी असते. पण ते त्यांच्याकडे टिकत नाही. तर काही मेहनत करूनही घर बांधू शकत नाही किंवा गाडी विकत घेऊ शकत नाही.प्रसिद्ध ज्योतिष डॉ. बसवराज गुरूजी यांनी सांगितलं की, घर किंवा गाडी खरेदीची स्थिती राशीचक्रातील चौथ्या स्थानावरून कळते. त्या घरातील ग्रह स्थितीवरून घर आणि गाडीबाबत विचार केला जातो. या घरातील ग्रह, त्या घरावर असलेल्या इतर ग्रहांची दृष्टी, ग्रहस्वामी आणि कारक ग्रहाचा प्रभाव घर आणि गाडी खरेदीवर पडतो.

मंगळ ग्रह हा जमीन, मालमत्ता आणि स्थावर संपत्तीशी निगडीत आहे. तर शुक्र वाहनं, वस्त्रे आणि दागिन्यांचा कारक आहे. चतुर्थ स्थानात मंगळ आणि शुक्राची स्थिती अशुभ असेल तर त्याचा विपरीत परिणाम होतो. अशुभ ग्रहांसोबतची युतीही प्रभाव टाकते. यामुळे घर किंवा वाहन खरेदीत अडथळा येतो. यासाठी ज्योतिष डॉ. बसवराज गुरूजी यांनी काही उपाय सांगितले आहेत.

  • वडिलधाऱ्यांचा आदर करण्याचा उपाय त्यांनी सूचवला आहे. आईकडून किंवा आईसारख्या वडिलधाऱ्यांकडून आशीर्वाद घ्यावा. प्रत्येक मंगळवारी वडिलधाऱ्यांना मदत करावी यामुळे स्थिरता येते.
  • दर बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करावा. सलग पाच बुधवारी गणपतीला गूळ आणि तूप अर्पण केल्यास घरात शुभता येते. तर दर मंगळवारी हनुमंताचं दर्शन घ्यावं.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट…
  • अँटिलियामधील सिक्यूरिटी गार्डला किती पगार? आकडा ऐकून चक्रावून जाल
  • हा द्रव पदार्थ म्हणजे सापांचा कर्दनकाळच, महिन्यातून फक्त एकदा शिंपडा, पुन्हा आयुष्यात साप दिसणार नाही
  • Akshaye KhannaMahakali : ‘हा धर्म की अधर्म?’ अक्षय खन्नाच्या ‘शुक्राचार्या’चा धडकी भरवणारा अवतार; ‘महाकाली’चा प्रोमो चर्चेत
  • 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा, CA चे हादरवणारे कारनामे उघड; आज करणार कोर्टात हजर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in