• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Astro 2026: शनि महाराज 138 दिवस वक्री स्थितीत, या राशींना मिळणार पाठबल! कसं काय ते जाणून घ्या

July 27, 2026 by admin Leave a Comment


ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती बदलली की त्याचा राशीचक्रावर परिणाम होतो. खासकरून पापग्रहांची स्थिती बदलली की राशीचक्रावर त्याचा प्रभाव अधिक असतो. न्यायदेवता शनि महाराज ज्योतिषशास्त्रानुसार पापग्रह आहेत. त्यामुळे त्यांच्या स्थितीत बदल झाला की राशीचक्रावर बरे वाईट परिणाम होणार यात काही शंका नाही. शनि महाराजांची स्थिती 27 जुलैपासून बदलली असून वक्री झाले आहेत. या स्थितीत 11 डिसेंबरपर्यंत असणार आहे. म्हणजेच 138 दिवस शनि महाराज या स्थितीत असतील. या कालावधीत शनि देव मीन राशीत असणार असून दोन नक्षत्रातून प्रवास करणार आहे. 27 जुलै ते 9 ऑक्टोबर या कालावधीत रेवती नक्षत्रात असतील. तर त्यानंतर स्वत:च्याच मालकिच्या उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करतील. वक्री स्थिती संपेपर्यंत या नक्षत्रात असतील. या दरम्यान, कुंभ, मीन आणि मेष राशीवर साडेसातीचा प्रभाव असेल. तर सिंह आणि धनु राशीला अडीचकी असेल. शनिच्या या स्थितीमुळे वृषभ, मिथुन, तूळ आणि वृश्चिक या चार राशींच्या लोकांना मोठा आर्थिक आणि व्यावसायिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

या राशींना मिळणार लाभ

वृषभ : शनिदेव या राशीच्या लाभ स्थान अर्थात एकादश स्थानात आहेत. या स्थानात शनिदेव जातकाच्या इच्छा पूर्ण करतात. तसेच आर्थिक लाभ मिळू शकतो. रखडलेली कामं मार्गी लागतील. नोकरीमध्ये पदोन्नती होऊ शकते. तसेच पगारवाढ होण्याची शक्यता आहे.

मिथुन : या राशीच्या कर्मस्थानात म्हणजे दशम स्थानात शनि वक्री स्थितीत आहे. हे स्थान नोकरी, व्यवसाय आणि सामाजिक प्रतिष्ठेचं मानलं जातं. शनिदेवता या स्थानात तुमच्या कष्टाचं पूर्ण फळ देईल. चांगली नोकरीची ऑफर मिळू शकते.

तूळ : या राशीच्या सहाव्या म्हणजेच शत्रूस्थानात शनि वक्री अवस्थेत आहेत. या स्थानात शनि अत्यंत बलवान मानला जातो. जुन्या कोर्ट कचेरीच्या प्रकरणात विजय मिळेल. तसेच काही जुनाट आजारातून मुक्ती मिळू शकते.

वृश्चिक: या राशीच्या पाचव्या स्थानात म्हणजे बुद्धी आणि संतती स्थानात शनी वक्री आहे. या स्थानातील शनिमुळे अचानक धनलाभ होऊ शकतो. इतकंच काय तर मोठा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

(डिस्क्लेमर : सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in