
Ashwini Paul Naldurg Fort: धाराशिवच्या ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यात एक काळीज पिळटवून टाकणारी घटना घडली. राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी मनोहर पौळ यांनी आपल्या तीन लहान मुलांना घेऊन किल्ल्यातील उपळी बुरुजावरून उडी घेतली आणि आयुष्य संपवलं. या घटनेने आता सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा अपघात आहे की स्वत: अश्विनी यांनीच लेकरांसोबत जीवन संपवण्याचा निर्णय घेतला, यावरुन आता जोरदार चर्चा सुरु आहे. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.
काैटुंबिक कलाहातूनच अश्विनी यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. या घटनेत अश्विनी पौळ आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अडीच वर्षांच्या दुसऱ्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एक मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. आता या प्रकरणात अश्विनी पौळ यांचा नवरा काय करतो याबद्दलची माहिती समोर आली आहे.
अश्विनी पौळ यांचे पती कोण?
लातूर जिल्हातील निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथून अश्विनी पौळ आपल्या तीन लेकरांसह नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी गेल्या होत्या. अश्विनी पौळ यांच्याबाबत आता मोठी माहिती पुढे येत आहे ती म्हणजे त्या एमएसएफमध्ये नोकरीसाठी होत्या. त्यांच्या पतीचे नाव मनोहर असून ते रिक्षाचालक असल्याची माहिती समोर आली आहे. पतीच्या सांगण्यावरून त्यांनी काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या नोकरीचा राजीनामा दिला होता. तीन महिन्यांपासून त्या आपल्या तीन लहान लेकरांसोबत राहत होत्या. मागील काही दिवसांपासून अश्विनी पौळ या मागील माहेरी राहत होत्या. त्यांच्या वडिल हे शिक्षक आहेत.
यादरम्यानच अश्विनी यांच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप केले आहेत. अश्विनी पौळ यांनी आपल्या लहान मुलांसह 100 फूट खोल दरीत उडी घेतली. त्यांच्या वडिलांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत म्हणाले की, ती गेल्या काही दिवसांपासून मानसिक त्रासात होती. सासरच्या लोकांकडून तिला खूप त्रास दिला जात होता.” आता या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरु आहे.
Leave a Reply