• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग

September 4, 2026 by admin Leave a Comment


राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. विधान परिषदेचे आमदार विक्रम काकडे यांनी नुकतीच शरद पवार आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम काकडे यांनी पुण्यात शरद पवारांच्या निवासस्थानी मोदीबाग येथे सुमारे अर्धा तास भेट घेतली. विधान परिषद निवडणुकीतील मदतीसंदर्भात ही भेट असल्याचे काकडे यांनी माध्यमांना सांगितले असले तरी, सूत्रांनुसार या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. शरद पवारांनी काकडेंकडे एक निरोप दिल्याचेही म्हटले जात आहे.

शरद पवारांच्या भेटीनंतर लगेचच विक्रम काकडे यांनी सुनेत्रा पवारांची त्यांच्या जिजाई निवासस्थानी भेट घेतली. शरद पवारांनी दिलेला निरोप काकडेंनी सुनेत्रा पवारांपर्यंत पोहोचवला आणि त्यांच्यातही विलिनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. आगामी काळात विक्रम काकडे पुन्हा शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात असून, या भेटींमुळे राजकीय घडामोडींना नवी दिशा मिळण्याची चिन्हे आहेत.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नेपाळ पुरात सुरुंगात अडकला, 9 दिवस करत राहिला हरे कृष्णचा जप, अन् कृष्ण जन्माष्टमीला घडला मोठा चमत्कार…
  • आरएसएस शताब्दी वर्ष : डॉ.मोहन भागवत यांचा लंडन दौरा, ६ सप्टेंबर रोजी “सेलिब्रेशन ऑफ ऑननेस” सोहळा
  • Women’s Asia Cup Live Streaming: भारत पाकिस्तान यांच्यात शनिवारी लढत, कधी आणि कुठे पाहता येणार सामना
  • ज्याचं चारित्र्य चांगलं नाही, त्यांना समजणार कसं?; स्वरा भास्करवर अनिरुद्धाचार्यांचा निशाणा
  • Driving Licence New Rules : तर थेट ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा, नवी पॉइंट सिस्टीम आहे तरी काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in