
काही दिवसांपूर्वी नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे संपूर्ण देशात मोठा हाहाकार उडाला होता. महापुराच्या तडाख्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला, अजूनही अनेकजण बेपत्ता आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच आता एक अशी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे. नेपाळमध्ये महापूर आल्यानंतर भूस्खलन झालं. या भूस्खलनादरम्यान दोन जलविद्युत कर्मचारी एका सुरंगात अडकले होते, त्यांना तब्बल 9 दिवसांनी जिवंत बाहेर काढण्यात यश आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार त्यातील एका व्यक्तीचं नाव संजय साह असं आहे. 30 वर्षीय संजय साह हे मधेश प्रांतामध्ये नेपाळ विद्युत प्रधिकरणाचे कर्मचारी म्हणून काम करतात. दरम्यान नेपाळमध्ये आलेल्या महापुरामध्ये भूस्खलन झालं आणि ते आपल्या अन्य एका साथिदारासह सुरुंगात अडकले.
दरम्यान त्यांना तब्बल 9 दिवसांनी जिवंत बाहेर काढण्यात यश आलं आहे. यावेळी संजय साह यांनी जो प्रसंग सांगितला त्यामुळे सर्वांनाच अश्चर्याचा धक्का बसला आहे.संजय साह यांनी सांगितलं की, आम्ही सुरुंगात अडकलो होतो, परंतु आम्ही हिम्मत हारली नाही. मी 9 दिवस देवाला माझा जीव वाचावा म्हणून प्रार्थन करत होता. हरे कृष्णचा जप करत होतो आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशीच मोठा चमत्कार घडला, माझा जीव वाचला, आम्हाला सुरुंगातून वाचवण्यात यश आलं आहे, अशी माहिती संजय साह यांनी दिली आहे.
अनेकजण बेपत्ता
दरम्यान या महापुराच्या संकटामध्ये नेपाळचं प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. अनेकजण अजूनही बेपत्ता आहेत, त्याचा शोध नेपाळ प्रशासनाकडून सुरू आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान या महापुराचा प्रचंड मोठा फटका हा नेपाळच्या पायाभूत सुविधांनाही बसला आहे. नेपाळमधील पायाभूत सविधा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. महापुरामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. अनेकांनी या घटनेत आपला जीव गमावला आहे.
Leave a Reply