• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ashwini Paul: माहेरून सोन्याच्या पाटल्या, ऑटोसाठी पैसे घेऊन ये; राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांच्या मृत्यूने खळबळ, FIRमध्ये गंभीर आरोप

September 4, 2026 by admin Leave a Comment


राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी त्यांच्या तीन लहान मुलांसह धाराशिवमधल्या नळदुर्ग किल्ल्यावरून 100 फूट खोल दरीत उडी घेतली. या धक्कादायक घटनेत अश्विनी आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा जागीच मृत्यू झाला. तर अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींपैकी क्रांती नावाच्या चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरी मुलगी वीरा गंभीर जखमी असून तिच्यावर धाराशिव इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. अश्विनी यांचे वडील तानाजी मोहिते यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. या एफआयआरमध्ये तानाजी यांनी त्यांच्या जावयावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

मुलींच्या जन्मानंतर अश्विनी यांना अधिक त्रास देण्यात आल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. सोन्याच्या पाटल्या आणि ऑटो रिक्षा घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत, यासाठी मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तानाजी यांची मुलगी अश्विनी यांचं लग्न 2020 मध्ये मनोहर अंकुश पौळ यांच्याशी झालं होतं. लग्नानंतर काही काळाने त्यांना मुलगा झाला. तक्रारीनुसार, 2021 मध्ये मुलगी अश्विनी आणि तिचा मुलगा अजिंक्य काही काळ माहेरी आले होते. त्यानंतर त्या पुन्हा सासरी गेल्या. त्यानंतर 2024 मध्ये त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या. दोन मुलींच्या जन्मानंतर सासरच्या मंडळींकडून त्यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पती मनोहर पौळ तसंच सासरच्या अन्य व्यक्तींकडून त्यांना त्रास दिला जात असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

सोन्याच्या पाटल्या आणि ऑटोसाठी पैशांची मागणी

‘दोन जुळ्या मुली झाल्या आहेत. तुझ्या आईवडिलांनी लग्नाच्या वेळी हुंड्यामध्ये काही दिलेलं नाही. त्यामुळे तू माहेरून सोन्याच्या पाटल्या आणि ऑटोरिक्षा घेण्यासाठी पैसे घेऊन ये, असं म्हणून वारंवार तिला मारहाण करून मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याचं आम्हाला अश्विनी फोनवर सांगत होती. त्यामुळे अश्विनीला सासरच्या लोकांकडून त्रास होऊ नये म्हणून त्यांना एक म्हैस विकत घेऊन दिली होती. तरीही अश्विनीच्या सासरचे लोक तिला त्रास देत होते,’ असं वडिलांनी एफआयआरमध्ये म्हटलंय.

एफआयआरमधील आरोपानुसार, लग्नाच्या वेळी हुंड्यामध्ये काही दिलं नसल्याचं सांगून अश्विनी यांचा छळ केला जात होता. सोन्याच्या पाटल्या घेण्यासाठी तसंच ऑटो रिक्षा घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली होती. पैसे आणले नाहीत तर तिला मारहाण केली जात असल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या सततच्या त्रासामुळे अश्विनी यांना मानसिक तसंच शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचं त्यांच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं. सासरच्या लोकांकडून होणारा त्रास वाढत गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या माहेरच्या व्यक्तींना याबाबत माहिती दिल्याचंही FIRमध्ये नमूद आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासण्याचं काम पोलिसांकडून केलं जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाजी कापण्याच्या सुरीने आईवरच पोटच्या मुलाचे सपासप वार, धक्कादायक घटनेने महाड हादरले…
  • राज्यात लवकरच नवं ऑपरेशन टायगर, शिंदेंच्या बड्या मंत्र्याने थेट सांगितलं; राजकीय वर्तुळात एकच चर्चा!
  • Photographer Murder Case : त्याचा 20 दिवसांपूर्वीच मृत्यू, तरी गर्लफ्रेंडसोबत सुरू होती रोमँटिक चाटिंग, सत्य समोर येताच पोलीसही हादरले; काय घडलं?
  • Salman Khan : कॅमेरा समोर येण्याची गरजच नाही…सलमान खानचा पारा चढला ! नक्की काय घडलं?; VIDEO व्हायरल
  • Who is Ayushi Shekhawat : क्रिकेटच्या मैदानात सौंदर्य अवतरलं, ती लावण्यवती नेमकी कोण; फोटो तुफान चर्चा!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in