• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ashish Shelar : राज ठाकरे, उद्धव ठाकरे गप्प का? झारखंडमध्ये विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर भाजपचा सवाल, आशिष शेलारांची काँग्रेसवर ती बोचरी टीका

August 11, 2026 by admin Leave a Comment


CJP आंदोलनाने देश ढवळून निघाला. तर दुसरीकडे झारखंडमधील जेपीएससी(JPSC) आणि जेएसएससी (JSSC) आंदोलनाने झारखंडमध्ये धुमश्चक्री उडाली. झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीचे इथं सरकार आहे. काल विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला आणि अश्रुधुराचा मारा करण्यात आला. त्यावरून आज दिल्लीपासून ते रांचीपर्यंत भाजप आक्रमक झाली आहे. या हल्ल्याविरोधात संसद परिसरापासून ते झारखंडपर्यंत मोठे आंदोलन सुरू आहे. आज इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी काँग्रेससह राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. त्याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली.

विद्यार्थ्यांना शत्रू म्हणून बडवले

भारताच्या संसदीय कार्य पद्धतीचे सत्र सुरू आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा संसदेत उपस्थित राहणार आहेत. पण चर्चेवेळी राहुल गांधी तुम्ही पळ काढू नका, राहुल गांधी तुम्ही सत्य ऐकण्याची तयारी ठेवा, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला. काल रांचीमध्ये आमचे विद्यार्थी आंदोलन शांतपणे करत होते. नोकर भरतीमध्ये पारदर्शकता असावी यासाठी हे तरुण आंदोलन करत होते. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला केला आहे. शत्रू समजून विद्यार्थ्याना बडवले आहे. हे अतिशय अमानुष आणि क्रूर आहे. सरकार कुणाचे आहे तर काँग्रेसचे सरकार आहे. या आंदोलनात बळाचा वापर का केला. राहुल गांधी हे तुमचे सरकार आहे. महिलांवर हल्ला करण्याचे आदेश कुणी दिले, असा सवाल शेलार यांनी विचारला.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे गप्प का?

या विद्यार्थ्यांनी कुठलीही अपमान जनक भाषा वापरली नाही. तरी विद्यार्थ्याना मारले यावर राहुल गांधी काय भूमिका मांडणार आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची बोबडी बंद का आहे. मातोश्री आणि शिवतीर्थचे दरवाजे का बंद आहेत, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांना आम्ही रांचीचे तिकीट पाठवून देऊ. उद्धव ठाकरे तुम्ही रांचीला जायला का तयार नाहीत. ते जर रांचीला जायला तयार असतील तर आम्ही तिकीट देऊ. सीजेपीला मालकाने आदेश दिल्यावर बोलतात, असे शेलार म्हणाले.

हेमंत सोरेन आणि काँग्रेस काय भूमिका मांडणार ?

झारखंड सरकारने विद्यार्थ्यांना शत्रू समजून झोडपले आहे. तारेचे कुंपण, लाठीचार्ज, महिलांवर हल्ले, पोलिसांकडून मारहाण अतिशय क्रूर आणि अमानुष हे वेदनादायी आणि संतापजनक आहे. झारखंड मध्ये काँग्रेस आणि सोरेन यांचे सरकार आहे.  या आंदोलनात बळाचा वापर का केला. पोलिसांना हे आदेश कुणी दिले हा प्रश्न आम्ही विचारायचं का ? आदेश कुणी दिले ? राजीनामा कुणाचा घेणात हे राहुल गांधींनी सांगावं विद्यार्थी केवळ मागण्यांवर बोलत आहेत, विद्यार्थी आंदोलनावर हेमंत सोरेन आणि काँग्रेस काय भूमिका मांडणार ? भाजपची संयमी भूमिका आहे, विद्यार्थी आंदोलनाला आमचं समर्थन असल्याचे आशिष शेलार म्हणाले.

राहुल गांधींवर टीका

राहुल गांधीला पार्लमेंटमध्ये फक्त हंगामा करायचे आहे, अशी टीका आमदार संजय उपाध्याय यांनी केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चांगले काम करत आहे. काल अमित शहाजीने एक एक प्रश्नाच्या उत्तर दिलेला आहे. प्रत्येक वेळी देशाची जे समस्या आहे त्याच्याबद्दल चिंतन करून संघ परिवार पुढची दिशा ठरवतात. अभिजीत दिपकेची भूमिका दुटप्पी आहे. केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन झालं त्याच्यामध्ये शिक्षा मंत्री यांनी राजीनामा दिला. पण झारखंड मध्ये जेव्हा आंदोलन सुरू आहे तिथे दिपके आणि त्यांचे सहयोगी आंदोलन करायला गेले नाही. फक्त मीडियामध्ये राहण्याकरता दिपके भाष्य करत आहे, असे उपाध्याय यांनी आरोप केला.

भाजपाच्या नेत्यांनी नरेंद्र मोदींच्या विरोधात आंदोलन करावे

राहुल गांधींनी निषेध व्यक्त केला आहे, जो दोषी असेल त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. जंतरमंतर झालेल्या लाठी चार्च उत्तर नरेंद्र मोदी द्यायला आले नाही. ते उत्तर द्यायला बांधील होते, त्यांनी राजीनामा दिली पाहिजे. भाजपाच्या नेत्यांनी नरेंद्र मोदींच्या विरोधात आंदोलन करावे, अशी मागणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली आहे. ज्या लोकांनी इतके वर्षे लोकांनी विरोध केले ते लोक आता तिरंगा रॅली काढत आहे, अशी त्यांनी टीका केली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण, पेट्रोल आणि डिझेल स्वस्त? जाणून घ्या आजचा भाव..
  • Horoscope Today 26th August 2026 : नशीब बदलण्याचे संकेत ! आज या राशींना मिळू शकतो मोठा फायदा; तुमची रास यात आहे का?
  • Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! सरकारने दिले रक्षाबंधनचे गिफ्ट, थेट खात्यात…
  • Bus Accident : भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरमध्ये घुसली, 5 ठार 20 जखमी
  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in