• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Arjun Tendulkar : 6 6 6 6 6.. अर्जुन तेंडुलकरची कमाल, गोलंदाजांची पिसं काढली, जे आयपीएलमध्ये जमलं नाही ते..

June 9, 2026 by admin Leave a Comment

मुंबई T20 लीगमध्ये अर्जुन तेंडुलकरने वादळी खेळी केली. त्याने ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवत प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला. ज्या अर्जुनला लखनऊ सुपर जायंट्सने IPL 2026 चा संपूर्ण सीजन बेंचवर बसवून ठेवलं, तोच मुलगा आता मुंबई टी20 लीग गाजवतोय. आपल्या धमाकेदार खेळाने अर्जुनने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. अर्जुन मुंबई T20 लीगमध्ये ARCS अंधेरी टीमचा भाग आहे. वांद्रे ब्लास्टर्स विरुद्ध खेळताना त्याने गोलंदाजीतही चमकदार प्रदर्शन केलं. तीन षटकात 11 धावा देत 3 विकेट काढल्या. यात एक मेडन ओव्हर होती. अर्जुनने 34 चेंडूत धमाकेदार 64 धावा फटकावल्या. आपल्या इनिंगमध्ये त्याने 4 फोर आणि 5 सिक्स मारले. अर्जुनने 194.12 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना आपल्या टीमला विजय मिळवून दिला.

अर्जुनच्या या प्रदर्शनानंतर क्रिकेट फॅन्स सोशल मीडियावर त्याचं भरभरुन कौतुक करत आहेत. प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्याला एक दिवस यश नक्की मिळतं अशा पद्धतीच्या लोक कमेंट्स करत आहेत. मुंबई टी20 लीगमध्ये वांद्रे ब्लास्टर्सने पहिली फलंदाजी केली. हा 16 वा सामना होता. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट गमावून 144 धावा केल्या. ARCS अंधेरीकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने गोलंदाजीत कमाल केली. त्याने 3 ओव्हर्समध्ये 11 धावा देऊन तीन विकेट काढल्या.

अर्जुन कितव्या नंबरवर फलंदाजीला आला?

त्यानंतर ARCS अंधेरीची टीम फलंदाजीला उतरली, तेव्हा नंबर 3 वर फलंदाजीला आलेल्या अर्जुन तेंडुलकरने 34 चेंडूत नाबाद 66 धावा फटकावल्या. आपल्या टीमला त्याने 9 विकेटने विजय मिळवून दिला. अर्जुनच्या दमदार फलंदाजीमुळे ARCS अंधेरी टीमने 13.5 ओव्हर्समध्येच हा सामना जिंकला.

आयपीएलच्या एका सामन्यात अर्जुनच प्रदर्शन कसं होतं?

मुंबई T20 लीगमध्ये अर्जुन तेंडुलकरने आपली योग्यता दाखवून देत टीकाकारांची तोंड बंद केली आहेत. आयपीएल 2026 मध्ये अर्जुनला फक्त एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. त्याने एकमेव सामन्यात अर्जुन तेंडुलकरने 4 ओव्हरमध्ये 36 धावा देत एक विकेट काढला होता.

T20 Mumbai League:

Arjun Tendulkar Won P.O.M Award in Today’s match!

(3-1-11-3) & (66* off 34) 🔥 pic.twitter.com/y8BV5rb9Zj

— 𝑺𝒉𝒆𝒃𝒂𝒔 (@Shebas_10dulkar) June 8, 2026

अर्जुन तेंडुलकर त्याच्या कामगिरीबद्दल काय म्हणाला?

“अशी कामगिरी कोणाला आवडणार नाही. टीमसाठी परफॉर्मन्स करणं नेहमी चांगलं असतं. मी चांगले चेंडू टाकले. विकेट मिळाले. मी चांगल्या एरियामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत होतो. विकेट मिळाले हे चांगलं झालं” असं अर्जुन त्याच्या कामगिरीबद्दल बोलला. “मी स्वत:ला ऑलराऊंडरच मानतो. कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करायला मला आवडते. टीम मला ज्या क्रमांकावर पाठवेल तिथे मी फलंदाजी करायला तयार आहे” असं अर्जुन तेंडुलकर म्हणाला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मिलिट्री मशीनची ताकद, भारतीय सैन्याच्या वाहनांमध्ये का केले जातात खास बदल?
  • निधीवाटपावर अखेर तोडगा निघाला, महायुतीच्या बैठकीत 2 महत्त्वाचे निर्णय; महामंडळाबाबत मोठी अपडेट समोर!
  • ECG आणि ड्युअल GPS असलेल्या फिचर्ससह Pixel Watch 5 भारतात लाँच, जाणून घ्या त्याची किंमत
  • Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
  • भारताचा बेस्ट PM कोण? अभिजीत दिपके यांच्या उत्तराने उंचावल्या भुवया, आवडत्या मुख्यमंत्र्याचं नावही सांगितलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in