• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Arijit Singh: अरिजीत सिंगबद्दल मोठी अपडेट; नवीन गाणं तर आलं पण निवृत्तीतून कमबॅक की..?

July 21, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगने काही महिन्यांपूर्वी पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. यापुढे कोणतीच नवीन गाणी गाणार नसल्याचं त्याने स्पष्ट केलं होतं. मात्र आता अभिनेता इमरान हाश्मीच्या ‘आवारापन 2’ या चित्रपटातील त्याचं नवीन गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यामुळे आता अरिजीतच्या निवृत्तीवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अरिजीतने त्याच्या निवृत्तीच्या निर्णयावरून यू-टर्न घेतला का? त्याच्या संन्यासाविषयीचं वृत्त खोटं होतं का, असे प्रश्न नेटकरी विचारत आहेत. यादरम्यान अरिजीतच्या मॅनेजरचा खुलासाही समोर आला आहे.

अरिजीत सिंगने 27 जानेवारी 2026 रोजी प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र आता त्याचं नवीन गाणं प्रदर्शित झाल्यानंतर चाहते प्रचंड खुश झाले आहेत. इमरान हाश्मीच्या ‘आवारापन 2’ या चित्रपटील ‘ये आवारापन’ हे गाणं विशेष भट्टने अरिजीतच्या आवाजात रेकॉर्ड केलं आहे. अमाल मलिकने या गाण्याला संगीतबद्ध केलं असून रश्मी विरागने याचे बोल लिहिले आहेत.

अरिजीत सिंगचं गाणं

अरिजीतने विशेष फिल्म्सच्या म्हणण्यावरून त्याचा निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्याची चर्चा आहे. कारण विशेष फिल्म्स आणि अरिजीत सिंग यांचं खूप जुनं नातं आहे. विशेष फिल्म्सनेच सर्वांत आधी अरिजीत सिंगवर विश्वास ठेवत त्याला ‘मर्डर 2’मधील ‘फिर मोहब्बत’ या गाण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर दोघांनी एकत्र अनेक हिट गाणी बनवली आहेत.

अरिजीतचं कमबॅक की..

‘द प्रिंट’ने अरिजीत सिंगच्या टीमशी संपर्क साधला असता त्यांनी त्याच्या कमबॅकच्या वृत्ताला नाकारलं आहे. “निवृत्तीची घोषमा करण्यापूर्वी त्याने जे प्रोजेक्ट साइन केले होते, तेच तो आता पूर्ण करत आहे. अरिजीत सिंग प्लेबॅक सिंगिंगमध्ये कमबॅक करत नाहीये. हे त्याचे जुने प्रोजेक्ट्स आहेत, जे आता प्रदर्शित केले जात आहेत”, अशी माहिती त्याच्या मॅनेजरने दिली आहे.

अरिजीत सिंगने 27 जानेवारी 2027 रोजी एक पोस्ट शेअर कर पार्श्वगायनातून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यात त्याने लिहिलं होतं, ‘नमस्कार.. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गेल्या अनेक वर्षांपासून एक श्रोता म्हणून तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रेमाबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. पण आतापासून मी पार्श्वगायक म्हणून कोणतेही नवीन काम करणार नाही. मी आता यातून रजा घेत आहे. हा एक अद्भुत प्रवास होता.’



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जगात खळबळ! अमेरिकेने घेतला व्हिसाबद्दल अत्यंत धक्कादायक निर्णय, थेट नियोजित..
  • Khavdya Dongar: वडिलांनी घर सोडलं अन् कुणाल पार खचला, मानसिक धक्क्यामुळे…अखेर ‘ते’ सत्य आलंच समोर..
  • सर्वात मोठी बातमी ! मोदींची प्रकृती बरी नाही, अस्वस्थ, थकले… कुणी केला दावा?
  • मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले…या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
  • तिच्या निधनानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला, थेट आठ दिवस व्हाईट हाऊसमध्ये…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in