• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

AR Rahman Son : ए. आर. रहमान यांच्या मुलाचा अपघात; कॅबला धडक, अमीनची प्रकृती कशी? बहिणीने सांगितलं सत्यला खुलासा

August 11, 2026 by admin Leave a Comment


प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांचा मुलगा आणि गायक ए. आर. अमीनच्या अपघाताची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. चेन्नईमध्ये पहाटेच्या सुमारास अमीनच्या कारचा अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं. या घटनेनंतर अमीनला दुखापत झाल्याची माहिती पसरली होती. मात्र, आता त्याची बहीण खतीजा रहमानने याबाबत महत्त्वाची माहिती देत अपघाताचं नेमकं सत्य स्पष्ट केलं आहे. “देवाच्या कृपेने अमीन, त्याचा मित्र आणि दुसऱ्या वाहनातील प्रवासी हे सर्व सुरक्षित आहेत,” असं खतीजाने सांगितलं. तसेच या घटनेशी संबंधित बातम्या देताना प्रसारमाध्यमांनी कुटुंबीयांकडून माहितीची खातरजमा करावी, अशी विनंतीही तिने केली आहे. चुकीच्या माहितीमुळे अशा प्रसंगी चाहत्यांमध्ये विनाकारण भीती आणि चिंता निर्माण होऊ शकते, असंही तिने म्हटलं.

पहाटे साडेतीनच्या सुमारास झाला अपघात

IANSच्या वृत्तानुसार, सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ए. आर. अमीन हा आपल्या मित्रासोबत कारने गिंडीच्या दिशेने जात होता. यावेळी जवाहरलाल नेहरू रोडवरील ऑलिम्पिया टेक पार्क परिसरात त्यांच्या वाहनाची एका कॅबला धडक झाली. या अपघातात अमीन आणि त्याच्या मित्राला किरकोळ दुखापत झाली. दोघांनाही तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून उपचार केले आणि प्रकृती स्थिर असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर दोघांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते सुखरूप घरी परतले.

खातिजाची पोस्ट काय?

“तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा, प्रार्थना आणि काळजीबद्दल मनापासून धन्यवाद. अल्लाहच्या कृपेने अमीन सुरक्षित असून त्याची प्रकृतीही ठीक आहे,” असं खातिजाने लिहिलं होतं. अमीन हा विमानतळाच्या दिशेने जात असताना तो कारच्या पुढील प्रवासी सीटवर बसला होता, तर त्याचा मित्र गाडी चालवत होता, असे तिने सांगितले. तिच्या सांगण्यानुसार, सिग्नल लाल असतानाही दुसऱ्या वाहन चालकाने गाडी पुढे नेल्याने हा अपघात झाला. “अमीन विमानतळावर जात होता. तो पुढील प्रवासी सीटवर बसला होता आणि त्याचा मित्र गाडी चालवत होता. त्यांच्यापुढे असलेल्या दुसऱ्या वाहनाच्या चालकाने सिग्नल लाल असतानाही गाडी पुढे नेली. त्यामुळे दोन्ही वाहनांची किरकोळ धडक झाली,” असं तिने पोस्टमध्ये नमूद केलं. मात्र सुदैवाने या अपघातात ,अमीन, त्याचा मित्र आणि दुसऱ्या वाहनातील व्यक्ती यांना फारशी दुखापत झाली नसून ते तिघेही सुरक्षित असल्याचे खातिजाने स्पष्ट केले.

अमीनच्या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरल्या. त्यामुळे खतीजाने माध्यमांना महत्त्वाचं आवाहन केलं. सेलिब्रिटींशी संबंधित कोणत्याही घटनेची बातमी देण्यापूर्वी संबंधित कुटुंबीयांकडून माहितीची खातरजमा करावी, असं तिने म्हटलं. “अशा परिस्थितीत चुकीच्या बातम्यांमुळे अनावश्यक चिंता आणि त्रास निर्माण होऊ शकतो,” असं खतीजाने स्पष्ट केलं.

दरम्यान, ए. आर. अमीन सुरक्षित असल्याचं समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला .

कॅबमधील प्रवाशालाही दुखापत

या अपघातात कॅबमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशालाही दुखापत झाली. त्याला कलैग्नर सेंटेनरी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. वैद्यकीय उपचारानंतर त्यालाही डिस्चार्ज देण्यात आला. सुदैवाने या अपघातात कोणालाही जीवघेणी दुखापत झालेली नाही. त्यामुळे अमीनच्या चाहत्यांनी घाबरून जाण्याचं कारण नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

ए. आर. अमीनच्या कारला झालेल्या या अपघाताचा तपास अद्यार ट्रॅफिक इन्व्हेस्टिगेशन विंगकडून केला जात आहे. दोन्ही वाहनांची धडक नेमकी कशी झाली, याचा पोलीस शोध घेत आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून अपघाताच्या क्षणापासून नेमका घटनाक्रम काय होता, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच दोन्ही वाहनांच्या चालकांचे आणि प्रवाशांचे जबाबही नोंदवले जाण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in