• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Anna Hajare | दिल्लीनंतर अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; सरकारविरोधात मौन आंदोलनाची घोषणा

July 23, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJP विद्यार्थी आंदोलनाला आता देशभरातून पाठिंबा मिळू लागला असून, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने संवादाचा मार्ग स्वीकारावा, या मागणीसाठी ते अहिल्यानगर येथे मौन आंदोलन करणार आहेत.

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मध्यरात्री आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याची घटना घडली. या कारवाईत अनेक आंदोलनकर्ते जखमी झाल्याचा दावा करण्यात येत असून, आंदोलनानंतर राजधानीतील वातावरण अधिकच तापले आहे.

दरम्यान, CJP आंदोलनाचे प्रमुख चेहरे असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे उपोषण 20 हून अधिक दिवसांपासून सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना पोलिसांनी जंतर-मंतरवरून रुग्णालयात हलवले असून, तेथूनही त्यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे. यानंतर आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजित दीपके आणि इतर आंदोलनकर्त्यांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे.

या आंदोलनाला देशभरातील विविध राज्यांतून तसेच अनेक सामाजिक संघटना आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.

अण्णा हजारे आज सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत अहिल्यानगर येथील वाडिया पार्कमधील गांधी स्मारक येथे मौन आंदोलन करणार आहेत. सरकारने विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा, अशी त्यांची भूमिका आहे. लोकशाहीत दडपशाहीऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

याशिवाय, आंदोलनाच्या स्थळाला प्रतीकात्मक स्वरूपात “नगरचे जंतर-मंतर” असे नाव देण्यात येणार असल्याची माहितीही समोर आली आहे. दिल्लीतील आंदोलनानंतर आता अहिल्यानगरातील अण्णा हजारे यांच्या आंदोलनाकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Special Report : एकामागून एक महाआपत्ती… नेपाळच का बनतंय निसर्गाचं ‘फेव्हरेट टार्गेट’?
  • Chitra Wagh : राजकारणात काम करतांना महिलांना अनेक..रितू तावडे, किशोरी पेडणेकरांना भेटल्यानंतर चित्रा वाघ यांचं महत्वाचं विधान
  • रक्षाबंधनावर आधारित हे गाणं ऐकून डोळ्यांत येईल पाणी, चित्रपटाची कथा एकदम जबरदस्त
  • थलपती विजय आता पंतप्रधानपदाच्या शर्यतीत, नव्या सर्व्हेमुळे राहुल गांधींची चिंता वाढली, नेमकी आकडेवारी काय
  • सचिनला येतीये सीमा हैदर अन् मुलांची आठवण, रडायला लागला, व्हिडीओमध्ये म्हणाला…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in