• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ankit Baliyan: प्रसिद्ध गायकावर जिमबाहेर झाडल्या 20 गोळ्या; मृतदेह रस्त्यावर ठेवत कुटुंबीयांचा आक्रोश

August 27, 2026 by admin Leave a Comment


Ankit Baliyan: हरियाणवी गायक आणि युट्यूबर अंकित बलियान याची बुधवारी संध्याकाळी शामली लखनौमधील शामली जिल्ह्यातील एका जिमबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर अंकितच्या कुटुंबीयांनी आणि चाहत्यांनी निदर्शनं करत रस्ता अडवला. कोतवाली परिसरातील आर्यपुरी नाला पात्रीजवळ संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला. पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, चार हल्लेखोर जिमबाहेर दबा धरून बसले होते. जेव्हा अंकित जिममधून बाहेर पडून त्याच्या गाडीकडे जाऊ लागला, तेव्हा त्यांनी त्याच्यावर गोळीबार केला.

गोळीबार होताच अंकितने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी त्याच्या गाडीचा दरवाजा उघडला आणि अगदी जवळून वारंवार गोळीबार केला. प्राथमिक माहितीनुसार, अंकितवर सुमारे 18 ते 20 गोळ्या झाडण्यात आल्या. पाच गोळ्या त्याच्या डोक्यात आणि पोटात लागल्या, तर तीन गोळ्या गाडीच्या पुढच्या विंडशील्डला लागल्या. अंकितला जवळच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पायी पळून गेले. या घटनेनंतर त्याठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं.

पोलीस अधीक्षक एन. पी. सिंह यांनी सांगितलं की, हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी, अंकितच्या हल्ल्यामागील हेतू जाणून घेण्यासाठी आणि आरोपींना अटक करण्यासाठी अनेक पथकं तयार करण्यात आली आहेत. पोलीस जिम आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत हसून या हल्ल्याचा हरियाणाशी काही संबंध आहे का, याचाही शोध घेत आहेत. अंकितवरील हल्ल्यामुळे त्याचे समर्थक आणि गावकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक झाला. त्यांनी गोळीबाराच्या ठिकाणापासून जवळपास 50 मीटर अंतरावर दिल्ली-मुजफ्फरनगरचा रस्ता अडवला. आंदोलकांनी आरोपींना तात्काळ अटक आणि कठोर कारवाईची मागणी केली.

कोण होता अंकित बलियान?

अंकित मूळचा शामली जिल्ह्यातील बंटीखेडा गावचा आहे. गेल्या काही वर्षांपासून तो हरियाणातील रोहतक आणि सोनीपत इथं गायन आणि अभिनयाचं शिक्षण घेत होता. ‘भरी कोर्ट में गोली मारेंगे मेरी जान’ या गाण्यामुळे ओळखला जात होता. 2023 मध्ये शामलीतील एका रोड शोदरम्यानही तो चर्चेत आला होता. पोलिसांनी अंकितचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून हल्लेखोरांच्या शोधासाठी नाकाबंदी केली आहे. या हत्येमागे जुनं वैर किंवा गँगवॉरचं कारण असल्याचं मानलं जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Floods : नेपाळच्या महाप्रलयातील थरकाप उडवणारा इमिग्रेशन सेंटरचा VIDEO, सद्गुरुंचे 77 अनुयायी कुठे?
  • झोप उडवणारी बातमी… नेपाळमध्ये पुन्हा महाजलप्रलय? 47 हिमनद्या वितळण्याचा धोका
  • Abhijeet Dipke: मी अमेरिकेतून तुरुंगात जाण्यासाठीच आलो; अभिजीत दीपकेंच्या नव्या वक्तव्याने वेधले लक्ष
  • नेपाळमध्ये आलेला पूर Made in China का? अखेर बिजींगने दिलं उत्तर
  • नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलकांना भेटणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in