• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Amitabh Bachchan : पान खाऊन शर्टावर थुंकली, तरीही अमिताभ यांनी प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बाबतीत दाखवला मनाचा मोठेपणा

June 26, 2026 by admin Leave a Comment


लागोपाठ हिट चित्रपट, दर्जेदार अभिनय यामुळे अमिताभ बच्चन बॉलिवूडमध्ये महानायक पदापर्यंत पोहोचले. त्यांना अभिनयाचं शेहनशहा उगाच म्हटलं जात नाही. शोले, डॉन, दीवार, जंजीर, बॉम्बे टू गोवा, नमक हराम असे एकाहून एक सरस चित्रपट अमिताभ यांनी दिले. ही हिट चित्रपटाची यादी खूप मोठी आहे. त्यामुळेच अमिताभ यांना बिग बी म्हटलं जातं. सर्वच भाषांच्या चित्रपटसृष्टीमध्ये अमिताभ यांना मानाचं, आदराचं स्थान आहे. आपली वर्तणूक, व्यवहार यामुळे सुद्धा अमिताभ यांनी चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलय. अमिताभ मनाने सुद्धा तितकेच मोठे आहेत. जुन्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री बिंदू यांनी विकी लालवानीला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्या मनाच्या मोठेपणाचा एक किस्सा सांगितला.

ऋषिकेशमध्ये आम्ही एका चित्रपटाचं शूटिंग करत होतो. दिवसाचं शूटिंग संपल्यानंतर सर्व कलाकारमंडळी आणि चित्रपटाचा क्रू डिनरसाठी डेहराडूनला गेला. जेव्हा आम्ही तिथून परत येत होतो, तेव्ही ही घटना घडली. कारने आम्ही सर्व परत येत होतो, त्यावेळी मी तोंडात पान चघळत होते. कारमध्ये अमिताभ माझ्या मागे बसले होते. मी थुंकण्यासाठी म्हणून कारची काच खाली गेली. पुढे काय घडणार याची बिंदू यांना कल्पना नव्हती. पान थुंकण्यासाठी म्हणून मी माझा डोकं बाहेर काढलं. मी पान थुकंले पण ते सर्व मागे बसलेल्या अमिताभ यांच्या शर्टावर उडालं असं बिंदू यांनी सांगितलं.

त्यावेळी कुठलाही माणूस चिडला असता

मला इतकी लाज वाटली, मी लगेच माफी मागितली. विकी लालवानशी बोलताना बिंदू यांनी हा किस्सा सांगितला. खरंतर त्यावेळी कुठलाही माणूस चिडला असता, पण अमिताभ यांनी शांतपणे प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले ठीक आहे, एवढी काही मोठी गोष्ट नाही. तो वैतागले नाहीत. पण हा किस्सा ते विसरले नाहीत. त्यानंतर काही दिवस ते यावरुन माझी फिरकी घ्यायचे असं बिंदू यांनी सांगितलं. अमिताभ आणि बिंदू यांनी जंजीर, अभिमान या चित्रपटात एकत्र काम केलय. बिंदू सुद्धा दमदार अभिनेत्री होत्या. मुख्य नायिकेच्या भूमिका फार त्यांच्या वाट्याला फार आल्या नाहीत. पण सहअभिनेत्री, खलनायिका म्हणून काम करताना त्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं. प्रत्येक चित्रपटात त्यांनी आपली छाप उमटवली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vaibhav Sooryavanshi: फक्त दोन गोष्टींची काळजी घ्यावी…आयर्लंडविरुद्ध धुमाकुळ घालण्यासाठी वैभवला द्रविडकडून मिळाला लाखमोलाचा सल्ला
  • प्रवाशांनी भरलेलं दोन विमान अचानक आमनेसामने; अहमदाबाद विमानतळावरच घडली थरारक घटना
  • Vaibhav Sooryavanshi : चांगल्या खेळाडूंची किंमत मोजून आम्ही..; वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत कोच स्पष्टच बोलले
  • Vaibhav Sooryavanshi: आयर्लंड क्रिकेट संघात पसरलीये वैभवची दहशत; कॅप्टन टकरने वंडर बॉयबद्दलची भीती बोलून दाखवली
  • ‘राजा शिवाजी’, ‘देऊळ बंद’नंतर या रहस्यमयी चित्रपटाची तगडी कमाई; 6 दिवसांत 61% बजेट वसूल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in