• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री कुठे आहेत? कधी बोलणार? सारखे तेच प्रश्न, अखेर अमित शाहंनी निर्णय घेतला, ठरवलं की..

August 10, 2026 by admin Leave a Comment


संसदेचं पावसाळी अधिवशेन सुरु असताना विद्यार्थी आंदोलनाबद्दल सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकार विद्यार्थ्यांशी संबंधित विविध मुद्यांवर सभागृहात चर्चा करण्यास तयार असल्याचं संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. विरोधी पक्षाला जे कुठले मुद्दे उपस्थित करायचे आहेत, त्या सगळ्यांची सरकार उत्तर देईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज सरकारच्यावतीने यावर उत्तर देतील. NEET पेपर लीक आणि विद्यार्थी आंदोलनावर संसदेत चर्चेची विरोधी पक्षाने सातत्याने मागणी केली आहे. विद्यार्थी आंदोलनावर चर्चा होईल, त्यावेळी सभागृहात गदारोळ करु नका असं किरेन रिजिजू यांनी विरोधी पक्षांना आवाहन केलं. सरकार चर्चेसाठी तयार आहे. सर्व पक्षांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली पाहिजे असं त्यांनी सांगितलं.

पण आता सध्या सभागृहात जोरदार गदारोळ सुरु आहे. लोकसभेत विरोधकांची जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. अमित शाह उत्तर द्या अशी मागणी विरोध करत आहेत. बिझनेस एडवायजरी कमिटी म्हणजे BAC च्या बैठकीत सरकारकडून विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्यावर चर्चेसाठी तयार असल्याचं सांगण्यात आलं. अयोध्या राम मंदिर दान चोरीच्या मुद्यावरही चर्चेची विरोधकांनी मागणी केली. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्यावरुन मागच्या काही दिवसांपासून सातत्याने विरोधी पक्षांकडून चर्चेची मागणी होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात येऊन उत्तर द्याव ही विरोधकांची मागणी आहे. ती सरकारने मान्य केली आहे.

गदरोळ करण्याऐवजी आपली बाजू मांडा

सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की आंदोलनावर चर्चेबद्दल सरकार उत्तर द्यायला तयार आहे. रिजिजू म्हणाले की, गृहमंत्री यावर उत्तर देतील. विरोधी पक्षाने गदरोळ करण्याऐवजी आपली बाजू संसदेत मांडली पाहिजे. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्यावरुन देशात बऱ्याच घडामोडी घडत आहे. मोदी सरकारला 12 वर्षात पहिल्यांदा आंदोलनामुळे एका मंत्र्याजा राजीनामा घ्यावा लागला आहे.

परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर

केंद्र सरकारने लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर केलं आहे. भविष्यात नीट पेपर फुटीसारख्या घटना रोखण्यासाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत. यंदा नीटचे पेपर फुटल्याने लाखो विद्यार्थ्यांना त्याचा फटका सहन करावा लागला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Today Horoscope : या चार राशींच्या आयुष्याचा कायापालट होणार, धन, संपत्ती घरात येण्यास सुरुवात; वाचा राशिभविष्य!
  • एका शब्दासाठी 17 रिटेक! लता मंगेशकरांना आली चक्कर; मधुबालावर चित्रित हे गाणं ठरलं एव्हरग्रीन
  • पानफुटीची पाने गुणकारी, या 5 आजारांवर रामबाण उपाय, खाताच फरक जाणवतो…
  • NIA ची जुन्नरसह पाच ठिकाणी झाडाझडती, हाती लागला महत्त्वाचा पुरावा? तपासात आढळलं काय? दहशतवादी…
  • मालेगाव महापालिकेत पुन्हा टिपू सुलतान यांचा फोटो, भुसे म्हणाले, असं केलं असेल तर… पुन्हा वाद पेटणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in