• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Airplane Facts: विमानाच्या टेकऑफ आणि लँडिंग दरम्यान लाईट्स मंद असण्याचं कारण काय? जाणून घ्या

June 30, 2026 by admin Leave a Comment


विमानाने प्रवास करणाऱ्या बहुतांश लोकांना टेकऑफ आणि लँडिंग दरम्यान लाइट्स मंद ठेवण्याचं कारणंच माहिती नसतं. अनेकांना असं फक्त आरामदायी अनुभव मिळावा यासाठी केलं जातं असं वाटतं. पण तसं अजिबात नाही. त्यामागे सुरक्षेचं गंभीर कारण आहे. विमानचालन सुरक्षेची आकडेवारी पाहिल्यावर तुम्हाला असं करण्याचं कारण किती गंभीर हे लक्षात येईल. विमान टेकऑफ आणि लँडिंग करताना सर्वाधिक अपघात होतात. त्यामुळे विमान लँडिंग करणं आणि टेकऑफ घेताना पायलट आणि क्रू मेंबर्सवर सर्वाधिक दबाव असतो. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव लाइट्स मंद ठेवल्या जातात. चला जाणून घेऊयात या मागची कारणं काय आहेत ती..

लाईट्स मंद करण्याचं कारण की…

फॅक्ट समजून घेताना एक उदाहरण देता येईल. आपण प्रखर प्रकाशात घरी असताना अचानक लाईट गेली तर डोळ्यासमोर अंधार येतो. म्हणजेच त्या अंधारासोबत जुळवून घेणं पटकन शक्य होत नाही. त्यामुळे आसपासच्या वस्तू अंधुक का होईना लक्षात येण्यासाठी थोडा वेळ लागतो. कमीत कमी पाच ते 20 मिनिटांचा अवधी लागू शकतो. असंच विमानात अचानक लाईट गेली तर केबिनमध्ये पूर्ण अंधार होईल. त्यामुळे विमानात बसलेल्या प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. अशा स्थितीतून सावरण्यासाठी क्रू आधीच लाइट्स मंद ठेवतात. त्यामुळे कमी प्रकाशात पाहण्याची सवय प्रवाशांना आधीच होईल. इमर्जन्सी स्थिती ओढावली तर प्रवाशांना आसपासच्या वस्तू पाहता येतील. तसेच बाहेर निघण्याचा रस्ता शोधता येईल.

विमानाची इमर्जन्सी एक्झिट असते खास

विमानाच्या इमर्जन्सी एक्झिटच्या रस्त्यासाठी खास प्रकाशमय तंत्राचा वापर केला असतो. वापरलेलं मटेरियल अंधारातही चमकतं. त्यामुळे अंधार पडला तरी चमचमत्या रस्त्यावरून मार्ग काढून बाहेर पडता येतं. दुसरीकडे, लाईट्स मंद केल्याने बाहेर पडण्याचा मार्ग अधिक स्पष्ट दिसतो. दुसरीकडे, टेकऑफ आणि लँडिंगच्या वेळी प्रवाशांना त्यांच्या खिडक्यांचे पडदे उघडायला सांगतात. नैसर्गिक प्रकाशामुळे क्रू सदस्य आणि प्रवाशी दोघांनाही परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येते.

विमानातील दिव्याबद्दल माहिती

असंही कारण असू शकते

फ्लाइट सेफ्टी फाउंडेशनच्या अभ्यासानुसार, विमानात वायू किंवा धूर भरला असेल तर प्रवाशांची दिशा ओळखण्याची क्षमता 83 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. अशा स्थितीत लाइट्स मंद असतील तर बाहेर पडण्याचे फलक स्पष्टपणे दिसतात. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडणं सोपं जातं.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मिलिट्री मशीनची ताकद, भारतीय सैन्याच्या वाहनांमध्ये का केले जातात खास बदल?
  • निधीवाटपावर अखेर तोडगा निघाला, महायुतीच्या बैठकीत 2 महत्त्वाचे निर्णय; महामंडळाबाबत मोठी अपडेट समोर!
  • ECG आणि ड्युअल GPS असलेल्या फिचर्ससह Pixel Watch 5 भारतात लाँच, जाणून घ्या त्याची किंमत
  • Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
  • भारताचा बेस्ट PM कोण? अभिजीत दिपके यांच्या उत्तराने उंचावल्या भुवया, आवडत्या मुख्यमंत्र्याचं नावही सांगितलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in