• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Abhishek Bachchan : ‘मी तिचं मत ऐकण्याइतका ..’ लेक आराध्याबद्दल अभिषेक बच्चन हे काय बोलून गेला ?

April 21, 2026 by admin Leave a Comment


‘गुरु’, ‘रन’, ‘युवा’, ‘दिल्ली 6’ आणि ‘धूम’ यासारख्या अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीतपणे वाजवूनही अभिषेक बच्चनला अंडररेटेड अभिनेता म्हटलं जातं. त्याने एकाहून एक सरस अशा चित्रपटांमध्ये काम केलंय, पण त्याची तुलना नेहमीच त्याच्या वडिलांशी, अमिताभ बच्चन यांच्याशी केली जाते. अभिषेकने नुकतीच एक मुलाखत दिली, ज्यामध्ये तो अनेक विषांयवर मोकळेपणाने बोलला. कोणत्याही कलाकारासाठी लोकांच्या कौतुकाइतंकच घरच्यांची प्रतिक्रिया, त्यांच्या कमेंट्स, त्यांनी केलेलं कौतुक ऐकणं महत्वाचं असतं. मा्त्र असं असलं तरी अभिषेक मात्र त्याच्या घरातील एक सदस्याची प्रतिक्रिया घेमं, मतं विचारणं टाळतो. ती व्यक्ती म्हणजे त्याची लेक. खुद्द भिषेकनचे याचा खुलासा केला. आपल्या चित्रपटांबद्दल तू तुझी मुलगी, आराध्या हिच्याशी चर्चा करतोस का, तिचं मत विचारतोस का ? असा प्रश्न अभिषेकला विचारण्यात आला. त्यावर अभिषेकने दिलेल्या उत्तराची सर्वत्र चर्चा होत आहे.

तिचं मत काय हे ऐकण्याइतका मी खंबीर नाही

एका मुलाखतीदरम्यान अभिषेकने यावर स्पष्टपणे मत मांडलं ” “मी तिला कधीच विचारणार नाही.” असं तो म्हणाला, रपण त्याने लगेचच त्यामागचं कारणही स्पष्ट केलं. ” मी तो विचार माझ्या मनातच राहू देईन. एकदा तिने उत्तर दिलं की —तिला माझं काम आवडलं किंवा नाही आवडलं तरी—माझ्या कामाची पद्धत बदलेल. म्हणून मी मुद्दाम तिला (आराध्याला) विचारत नाही, कारण कदाचित तिचं मत ऐकण्याइतका खंबीर मी नाही. तिला काय आवडेल किंवा नाही याचा विचार करणंच मला अधिक पसंत आहे” असं अभिषकने नमूद केलं.

आराध्याच्या मताने प्रभावित व्हायचं नाहीये

आजची मुलं अधिक मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे स्वतःचं मत व्यक्त करतात, असं अभिषेक बच्चन पुढे म्हणाला. “आजची मुले खूप कॉन्फिडंट असतात, त्यांना नक्की काय हवं आहे हे त्यांना माहीत असते. ते स्वतःला स्पष्टपणे व्यक्तही करतात. कधीकधी आमच्या पिढीतील लोकांना त्यांचे ऐकून घेणे अवघड जाते.” असं त्याने पुढे नमूद केलं.

“कारण ते अगदी सरळ आणि थेट, स्पष्ट बोलता. आणि प्रत्येक वेळेस ते ऐकू घेणं हे सोपं नसतं. एक पालक म्हणून, मला इतरांच्या मतांनी प्रभावित न होता, ज्यावर माझा विश्वास आहे तेच करायचं आहे. कदाचित कालांतराने हा विचार बदलेल” असंही अभिषेकने सांगितलं.

आराध्याचं मत कधी घेणार विचारात ?

पुढे अभिषेकने हेही मान्य केलं की एक वेळ अशी येईल की मी माझ्या मुलीला तिचं मत विचारेन. तो म्हणाला, ” देवाची इच्छा असेल तर, जेव्हा ती स्वतः आई होईल, तेव्हा मी तिला कदाचित विचारेन. पण सध्या, मला तिच्या विचारांनी प्रभावित व्हायचं नाही. मला नाही वाटत की मी तिला कधी (हा प्रश्न) विचारने” असं त्याने सांगितलं. “मला खात्री आहे की ती कधीतरी तिचं मत देईल, पण मी अजून तिला विचारलेलं नाही” असंही तो हसून पुढे म्हणाला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vaibhav Suryavanshi: ‘मी सामना हिसकावू शकतो’, वैभव सूर्यवंशीचे IPL 2026 मध्ये ओपन चॅलेंज, गोलंदाजांना थेट इशारा
  • Sushma Andhare : महिलांच्या हक्कासाठी बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता, तुमची तयारी आहे का राजीनामा द्यायची? सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल
  • या अभिनेत्रीने केलं होतं टॉपलेस फोटोशूट, भरावा लागला होता दंड, अंडरवर्ल्ड डॉनसोबत संबंध, बर्बाद झालं करिअर
  • Sahar Shaikh : ‘कैसा हराया’ बोलून रातोरात प्रसिद्ध झालेली मुंब्र्याची नगरसेविका सहर शेखवर मोठा आरोप, तिने समोर येऊन दिलं स्पष्टीकरण
  • GT vs MI : मुंबईचा युवा स्टार अश्वनी कुमारचा तो एक खास चेंडू गुजरातच्या टीमला झेपलाच नाही, शुबमन गिलने सत्य मान्य केलं की..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in