
90 च्या दशकातील गाजलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी य बॉलिवूडमध्ये मोठं यश मिळवूनही अचानक अध्यात्माचा मार्ग स्वीकारला, ही गोष्ट आजही अनेकांसाठी आश्चर्याची आहे. शाहरुख खान, सलमान खान यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम करून सुपरहिट चित्रपट दिले.
ममता कुलकर्णी यांनी त्यांच्या करिअरच्या शिखरावर असताना सिनेसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. तरीही त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.
2000 च्या सुमारास ममता कुलकर्णी यांनी अध्यात्माकडे वळण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, दुबईतील अंडरवर्ल्ड ड्रग माफिया विक्की गोस्वामी यांच्यासोबत त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. या वादग्रस्त संबंधांमुळे बॉलिवूडमध्ये त्यांना काम मिळणं कठीण होऊ लागलं. अनेक दिग्दर्शकांनी त्यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला.
2002 पर्यंत परिस्थिती बदलत गेली आणि अखेर त्यांनी बॉलिवूडला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, इंडस्ट्री सोडण्यापूर्वी त्यांना 30-40 चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या होत्या. मात्र त्यावेळी त्यांच्या मनाला हे सगळं क्षणभंगुर वाटू लागलं होतं.
ममता यांनी पुढे सांगितलं की, त्यांनी नऊ दिवस आईची आराधना केली. त्यानंतर त्यांच्या आईचं निधन झालं आणि त्या घटनेनंतर त्यांच्या मनात कोणतीही इच्छा उरली नाही. त्यामुळे त्यांनी सिनेसृष्टीपासून पूर्णपणे दूर जाण्याचा निर्णय घेतला.




Leave a Reply