• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Abhishek – Aishwarya : घटस्फोटाच्या चर्चांनंतर ऐश्वर्या – अभिषेकची एकत्र पोस्ट व्हायरल, चर्चांना उधाण

July 25, 2026 by admin Leave a Comment


Abhishek – Aishwarya : एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूड, सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये फक्त अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण रंणाऱ्या चर्चा फक्त अफवा होत्या हे दोघांनी वारंवार सिद्ध करुन दाखवलं. आता देखील असंच काही झालं आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटो दोघांनी पोस्ट केलेला नाही तर, त्यांच्या एका चाहत्याने पोस्ट केला आहे. सांगायचं झालं तर, ऐश्वर्या आणि अभिषेक सध्या लेक आराध्या हिच्यासोबत न्ययॉर्क येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे… अशात न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फिरत असताना एका चाहत्यासोबत दोघांनी सेल्फी क्लिक केला. आता याच फोटोवर नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

सांगायचं झालं तर, या वर्षाच्या सुरुवातीला अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय नववर्षाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये दिसले होते. या जोडप्यासोबत त्यांची मुलगी आराध्या बच्चन देखील. रेस्टॉरंट्सना भेटी देण्यापासून ते चाहत्यांसोबत फोटो काढण्यापर्यंतचे त्यांचे फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले. आता देखील व्हायरल झालेल्या फोटोमुळे ऐश्वर्या – अभिषेक चर्चेत आले आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by 🦋Aishwarya(ऐश्वर्या)🦋 (@diehardfanofaishwaryarai_arb)

दरम्यान, अनेकदा ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरलेला. अनेक कार्यक्रमांमध्ये अभिषेक त्याच्या कुटुंबियांसोबत दिसला, तर ऐश्वर्या हिला लेक आराध्या हिच्यासोबत स्पॉट करण्यात आलं. एवढंच  नाही तर, अनेक ठिकाणी ऐश्वर्या आणि आराध्या दोघींनाच स्पॉट करण्यात आल्याने घटस्फोटाच्या चर्चांनी आणखी जोर धरला. पण रंगणाऱ्या चर्चांमध्ये काही तथ्य नाही, हे देघांनी देखील सिद्ध करुन दाखवलं.

ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबियांच्या उपस्थितीत दोघांचा लग्न सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. 2007 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ आजही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. लग्नानंतंर 2011 मध्ये ऐश्वर्याने आराध्या हिला जन्म दिला…

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे सिनेमे

दोघांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिषेक बच्चन शेवटचा ‘राजा शिवाजी’ या मराठी सिनेमात दिसला होता. येत्या काळात अभिनेता अन्य सिनेमांच्या माध्यमातून देखील चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. तर दुसरीकडे, ऐश्वर्या शेवटची मणी रत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’मध्ये दिसली होती. ही जोडी एका नवीन सिनेमात एकत्र काम करणार असल्याच्या चर्चाही रंगलेल्या.

 





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in