• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Abhijit Dipke : जंतर मंतरवरील आंदोलनाचा खरा हिरो कोण? अभिजीत दिपकेंनी दिलं या व्यक्तीला श्रेय, पहिल्यांदाच नाव समोर

July 31, 2026 by admin Leave a Comment


नीट परीक्षेच्या पेपर लीकनंतर देशभरात वातावरण चांगलंच तापलं होतं. या प्रकरणात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली होती. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी तब्बल एक महिना दिल्लीमधील जंतर मंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू होतं. सोनम वांगचूक हे उपोषणाला बसले होते. दरम्यान त्यानंतर वीस जुलै रोजी आंदोलकांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी थेट संसदेवर मोर्चा काढला, मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळालं, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला तर दुसरीकडे आंदोलकांनी देखील पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर विरोधी पक्षाचा देखील या आंदोलनाला पाठिंबा मिळाला आणि अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला.

दरम्यान सध्या सोशल मीडियावर अभिजीत दिपके आणि सोनम वांगचूक यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या काही बातम्या व्हायरल होत आहेत, या सर्व बातम्यांचं अभिजीत दिपके यांच्याकडून खंडण करण्यात आलं आहे, यावेळी बोलताना त्यांनी सोनम वांगचूक यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे. आमच्या दोघांचे विचार जवळपास सारखे आहेत, आम्ही सोनम वांगचूक यांच्या त्यागाला आणि बलिदानाला कधीही विसणार नाही, असं दिपके यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले अभिजीत दिपके?

सोनम वांगचूक सरांच्या त्यागाला आणि बलिदानाला आम्ही कधीही विसरू शकणार नाहीत, त्यांनी तब्बल 26 दिवस उपोषण केलं. त्यांनी या आंदोलनासाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. त्यांनी आपला जीव पणाला लावून संपूर्ण देशाला जागं करण्याचा काम केलं. त्यांच्यामुळेच लोकांना रस्त्यावर उतरून सरकारला प्रश्न विचारण्याची हिम्मत मिळाली, त्यांच्या उपोषणाशिवाय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणं शक्यत नव्हतं, असं यावेळी दिपके यांनी म्हटलं आहे. दरम्यान आंदोलन सुरू असतानाच आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नसताना देखील सोनम वांगचूक यांनी आपलं उपोषण मागे घेतलं होतं. यावर देखील दिपके यांनी प्रतिक्रिया दिली आहे, मला स्वत:ला देखील असं वाटत होतं की त्यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं असं दिपके यांनी म्हटलं आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तीन नवजात बालकांचा मृत्यू, आमदार रवी राणा यांचा डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप..
  • 86 हजार 622 कोटींचं बिल थकीत, कंत्राटदार आर्थिक अडचणीत; शिवतीर्थावर घेणार राज ठाकरेंची भेट
  • IND vs SL: यशस्वी जयस्वालचा माज खपवून घेतला जाणार नाही, भारतीय कोचकडून थेट वॉर्निंग
  • Drishyam 3: विजय साळगावकरचा शेवटचा डाव, अजय देवगणचा ‘दृश्यम: द कन्क्लुजन’; दोन भागांनी वाढवलेलं गूढ आता संपणार
  • शारीरिक संबंधांसाठी प्रेयसीला घेऊन गेला जंगलात, कपडे काढताच… प्रकरण समोर येताच पोलिसही हादरले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in