• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Abhijeet Dipke : CJPचं Instagram बंद, दीपके संतापले; म्हणाले – किती मोठे भित्रे!

August 15, 2026 by admin Leave a Comment


राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करत संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणारे कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांना स्वातंत्र्यदिनाच्या सकाळीच मोठा धक्का बसला आहे. याचं कारण म्हणजे CJP अधिकृत इंस्टाग्राम पेजवर टाळं लागलं आहे. खु्द सीजेपीचे संसथ्पाक अभिजीत दीपके यांनीच ही माहिती दिली आहे. X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी एक फोटो शेअर करत एक पोस्ट लिहीत संताप व्यक्त केला. सीजेपीचं पेज ब्लॉक करणाऱ्यांना ‘भित्रे’ असं म्हणत दीपके यांनी सुनावलं आहे. त्यांचा चांगलाच भडका उडाल्याचे दिसत आहे.

आज 15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनाच्या सकाळीच अभिजीत दीपके यांनी ‘एक्स’वर इंस्टाग्राम पेजचा स्क्रीनशॉट शेअर करत थेट शब्दांत नाराजी व्यक्त केली. “त्यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे अधिकृत इंस्टाग्राम हँडल हटवलं. किती मोठे भित्रे आहेत!” असं म्हणत दीपके यांनी त्या पोस्टद्वारे संताप व्यक्त केला आहे.

 

They took down the official Instagram handle of Cockroach Janta Party.

Bloody cowards! pic.twitter.com/q5lNBwOlRf

— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) August 15, 2026

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छांसाठी निवडला आंदोलनाचा फोटो

विशेष म्हणजे, आजच्याच दिवशी दीपके यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना निवडलेला फोटोही चर्चेचा विषय ठरला आहे. नीट पेपर लीक प्रकरणाच्या वेळी दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचे छायाचित्र अभिजीत दीपके यांनी शेअर केलं. “स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. हा फोटो आपल्यासाठी एक आठवण आहे की आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे” असंही त्यांनी या फोटोसोबत लिहीलं.

CJI सूर्यकांत यांच्या वक्तव्यानंतर CJP चा जन्म

‘कॉकरोच जनता पार्टी’ची सुरुवातही एका चर्चेत आलेल्या वक्तव्याच्या निषेधातून झाली होती. भारताचे मुख्य न्यायाधीश CJI सूर्यकांत यांच्या एका वक्तव्यानंतर अभिजीत दीपके यांनी विरोध दर्शवण्यासाठी CJPचे सोशल मीडिया पेज तयार केलं होतं. मातर पाहता पाहता हे पेज सोशल मीडियावर लोकप्रिय झालं. एक्स आणि इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स जोडले गेले. त्यानंतर दीपके अमेरिकेतून भारतात परत आले आणि CJPच्या बॅनरखाली नीट पेपर लीकविरोधात त्यांनी जंतरमंतर येथे आंदोलन सुरू केलं.

जंतर-मंतरनंतर आता गावाकडे मोर्चा

CJPच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो लोकांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनात सहभाग घेतला, ते यशस्वी ठरलं. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामाही झाला. मात्र आता दीपके यांनी आंदोलनाचा फोकस केवळ नीट पेपर लीकपुरता मर्यादित न ठेवता देशातील शिक्षणव्यवस्थेतील मूलभूत समस्यांकडे वळवण्याची घोषणा केली आहे. याचाच भाग म्हणून आता CJPकडून ‘स्कूल ठीक करो’ अभियान सुरू करण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात अभिजीत दीपके यांच्या महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील गावातून होणार आहे. ग्रामीण सरकारी शाळांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणं, शाळांची दुरुस्ती करणं आणि स्थानिक पातळीवर प्रशासनाची जबाबदारी निश्चित करणं हा या अभियानाचा उद्देश आहे.

“मी माझ्या गावातून ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची सुरुवात करणार आहे, तेथील सरपंचांना स्थानिक सरकारी शाळांची दुरुस्ती करण्याची आणि शाळेत बाके, पिण्याचे पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करण्याची विनंती करणार आहे” असं म्हणत दिल्लीहून परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दीपके यांनी या अभियानाची भूमिका स्पष्ट केली. त्यालाठी अनेक टीम तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितलं. या टीम गावागावांत जाऊन नागरिक आणि सरपंचांशी संवाद साधणार आहेत.

 





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in