• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Abhijeet Dipke : पोलीस ज्याला शोधत होते, तो वाँटेड आरोपी अभिजीत दीपकेंच्या मंचावर?; काय आहेत आरोप? प्रकरण काय?

August 11, 2026 by admin Leave a Comment


नीट पेपरफुटीच्या प्रकरणावरून आक्रमक झालेल्या तरूणाईने, जेन-झीने राजधानी दिल्लीत केलेलं आंदोलन सर्वांनीच पाहिलं. कॉकरोच जनता पार्टीनेही (CJP) तरूणाईला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी ते आग्रही होते. अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि आंदोलनाला माोठं यश मिळालं. दरम्यान सीजेपीच्या आंदोलनात एक वॉंटेड आरोपी सहभागी झाल्याची आणि सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) यांच्यासोबत दिसून आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. एवढंच नव्हे वाँटेड आरोपी रामचंद्र याला अटक करण्यासाठी राजस्थान पोलिसांचं चार सदस्यीय विशेष पथक दिल्लीतील जंतर-मंतरवर पोहोचलं होतं असंही समोर आलंय. CJPच्या आंदोलनादरम्यान रामचंद्र तिथे उपस्थित असल्याची ठोस माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, गर्दी आणि आंदोलनातील प्रमुख व्यक्तींमध्ये त्याची सतत असलेली उपस्थिती यामुळे पोलिसांना कारवाईची संधीच मिळाली नाही. अखेर तो फरार झाला.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, रामचंद्र जंतर-मंतरवर असल्याची ठोस माहिती मिळाल्यानंतर राजस्थान पोलिसांचे पथक तातडीने दिल्लीला रवाना झालं. पथकाने घटनास्थळी पोहोचून त्याच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवली. मात्र, रामचंद्र सतत अभिजीत दीपके आणि इतर प्रमुख व्यक्तींच्या आसपासच वावरत होता. कधी तो मंचाजवळ दिसत होता, तर कधी गर्दीत मिसळत होता. त्यामुळे त्याला इतरांपासून वेगळे करून ताब्यात घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरलं.

17 लाखांच्या फसवणुकीचा आरोप

रामचंद्रविरोधात राजस्थानमधील झुंझुनू येथील कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हा दाखल आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये दाखल झालेल्या या प्रकरणात AVYAAN Automotive Pvt. Ltd.च्या माध्यमातून वाहन खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्याचा उल्लेख त्यामध्ये होता. तक्रारदार साजिद दिवान यांच्या आरोपानुसार, Range Rover Defender 130 गाडी मिळवून देण्याचे आश्वासन देत रामचंद्रने त्यांच्याकडून तब्बल 17 लाख रुपये आगाऊ घेतले होते. मात्र, पैसे घेतल्यानंतर ना गाडी देण्यात आली, ना आगाऊ रक्कम परत करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रामचंद्रला चौकशीसाठी हजर राहण्याच्या अनेक नोटिसा बजावल्या. मात्र, तो चौकशीसाठी हजर झाला नसल्याचे पोलिसांचं म्हणणं आहे.

जंतर-मंतरवर पोलिसांचा दोन दिवस वॉच

कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी श्रवण कुमार मील यांच्या सांगण्यानुसार, राजस्थान पोलिसांच्या पथकाने जवळपास दोन दिवस जंतर-मंतरवर तळ ठोकला होता. रामचंद्र गर्दीतून किंवा मंचापासून काही क्षणांसाठीही वेगळा झाला, तर त्याला तत्काळ ताब्यात घेण्याची पोलिसांची तयारी होती. मात्र, तो सतत लोकांच्या गराड्यातच होता. मंचाजवळ आणि आंदोलनातील प्रमुख व्यक्तींसोबत त्याची सतत ये-जा सुरू होती. त्यामुळे थेट कारवाई केल्यास गर्दीत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता होती. संभाव्य कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी त्याला घटनास्थळी अटक करण्याचा धोका पत्करला नाही.

अभिजीत दीपकेवर शाईफेक झाली, तेव्हाही आरोपी होता घटनास्थळी

CJPच्या आंदोलनादरम्यान अभिजीत दीपके यांच्यावर शाई फेकण्याची घटना घडली होती. या घटनेच्या वेळीही रामचंद्र घटनास्थळी उपस्थित असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो आयोजक आणि इतर प्रमुख व्यक्तींच्या संपर्कात असल्याचेही दिसून आले. विशेष म्हणजे, रामचंद्र सोशल मीडियावरही CJPशी आपला संबंध असल्याचे दाखवलं. त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलच्या बायोमध्ये त्याने स्वतःला ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या कोअर टीमचा सदस्य असल्याचे नमूद केलं असून, बायोमध्ये ‘CJP Core’ असंही लिहीलं आहे.

पोलिसांचे पथक दोन दिवस जंतर-मंतरवर त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होतं. मात्र, गर्दी आणि मंचावरील सततची उपस्थिती यामुळे रामचंद्रला तिथेच अटक करता आली नाही. अखेर पोलिसांना माघार घ्यावी लागली. रामचंद्र सध्या फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी राजस्थान पोलिसांकडून विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण, पेट्रोल आणि डिझेल स्वस्त? जाणून घ्या आजचा भाव..
  • Horoscope Today 26th August 2026 : नशीब बदलण्याचे संकेत ! आज या राशींना मिळू शकतो मोठा फायदा; तुमची रास यात आहे का?
  • Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! सरकारने दिले रक्षाबंधनचे गिफ्ट, थेट खात्यात…
  • Bus Accident : भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरमध्ये घुसली, 5 ठार 20 जखमी
  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in