• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Abhijeet Dipke: पुढील आठ दिवसांत जर…अभिजीत दिपकेचा सरकारला थेट इशारा, Video Viral

August 15, 2026 by admin Leave a Comment


CJP कडून आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ‘स्कूल ठीक करो’ या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. CJP चे संस्थापक अभिजीत दिपके  या मोहिमेसाठी हिंगोली जिल्ह्यातील त्यांच्या मूळगावी संतुक पिंपरी येथे गेले आहेत. ध्वजारोहण या कार्यक्रमानंतर अभिजीत दिपके त्यांच्या गावातील प्राथमिक शाळेत गेले. त्यांनी शाळेची पाहणी केली. यावेळी शाळे असलेली दुरवस्था त्यांच्या निदर्शनास आली. राज्यातील अनेक शाळांची अत्यंत दुरवस्था झाली आहे आणि या सर्व शाळा ठीक करण्याची नितांत गरज आहे, अशी भूमिका अभिजीत दिपके यांनी मांडली.

शाळेच्या पाहणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या वर्गातील खिडक्या फुटलेल्या असल्याचे निर्दशनास आले. तसेच शाळेतील शौचालयाचीही अवस्था अत्यंत खराब असल्याचे दिसले. विशेष म्हणजे, फुटलेल्या खिडक्यांना झाकण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा बॅनर लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले.  या सर्व परिस्थितीवर अभिजीत दिपके प्रचंड नाराज दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhijeet Dipke (@abhijeetdipke)

अभिजीत दिपके पत्रकार परिषदेत म्हणाले की, “खिडक्या फुटक्या आहेत, बाथरूम घाण आहे. ग्रामीण भागातील शाळा ठीक केल्या नाही तर विकास कसा होणार? वरच्या स्तरावरून अडचणी आहेत पण पुढील आठवड्यात दुरुस्ती करून पुन्हा एकदा भेटूयात. पुढील आठ दिवसात सर्व दुरुस्त्या केल्या जातील, अशा शब्द सरपंचांनी दिल्याची माहिती दिपके यांनी दिली.

अभिजीत दिपके पुढे म्हणाले की,  “शिक्षकांना SIR साठी कामाला लावलं जात आहे. इतर लोकांना एसआयआरसाठी कामाला लावा आणि शिक्षकांना फक्त शिकवण्याचे काम द्या. शाळा बंद पडत असल्याने, सरकारचे धोरण जबाबदार आहे. खासगी शाळांना सुरू ठेवण्यासाठी सरकारी शाळांकडे दुर्लक्ष केल जाताय असा आरोप त्यांनी यावेळी केला.

“80 वर्षांनंतरही आपल्या देशातील शाळेत पिण्याचे पाणीही नाही. आमदार झाले की त्यांचे बंगले होतात. मग या मुलांचे काय? ग्रामीण भागातील लोक जास्त मतदान करत आहेत, कारण त्यांच्या मुलांचे भविष्य तुमच्या हातात आहे. नवीन पीएम हाऊस आणि पार्लमेंट मात्र बांधले जात आहे, हे सर्व आधी बंद करा आणि आधी शाळा बांधा. नवीन पीएम हाऊस आणि पार्लमेंटमुळे देशाची प्रगती होणार आहे का?. 80 वर्ष झाल्यानंतरही आपण अजूनही जातीवादात अडकतो, मग कसले हे विश्वगुरू? ‘बटेंगे तो कटेंगे’ यामुळे आता काय होणार आहे? या भानगडीत अजिबात पडू नका. शिक्षित होणे म्हणजे चांगला माणूस बनणे होय हे समजून घ्या.  मागील 40 वर्षांत सर्वात जास्त बेरोजगारी आता होणार आहे,” असे देखील अभिजीत दिपके म्हणाले.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in