• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Abhijeet Dipke : अभिजीत दीपकेंना मोठा दणका; दिल्लीत पोलीस तक्रार दाखल

August 4, 2026 by admin Leave a Comment


देशाच्या राजकारणातून मोठी बातमी हाती आली आहे. दिल्लीतील एका व्यक्तीने सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके यांच्या विरोधात दिल्लीत पोलीस तक्रार दिली आहे. अभिजीत दीपके यांच्या सहकाऱ्यांनी हल्ला केल्याचा आरोप पोलीस तक्रारीत केला आहे. फैजान अन्सारी असे तक्रारदार व्यक्तीचे नाव आहे. सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर फैजान अन्सारी यांनी दीपके यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी आंदोलनावेळी केलेल्या कारवाईवरून दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि पोलिसांचं कौतुक केलं. तसेच दीपके हे स्वार्थासाठी वागत असल्याचा आरोप त्यांनी केला.

अभिजीत दीपकेंना अटक करण्याची मागणी 

‘एनआयआय’ वृत्तसंस्थेनुसार, अन्सारी यांनी म्हटलं की, मी अभिजीत दीपके यांच्या विरोधात दिल्ली पोलीस उपायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. अभिजीत दीपके यांच्या सहकाऱ्यांनी माझ्यावर हल्ला केला. त्याचा पुरावा देखील माझ्याकडे आहे. माझ्यावर पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हल्ला झाला. या संदर्भात पोलिसांत दोन गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे दीपके यांना तात्काळ अटक करावी, अशी माझी मागणी आहे’. तसेच त्यांनी आंदोलनावेळी केलेल्या कारवाईवरून दिल्ली पोलिसांचं विशेष कौतुक केलं. मी दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि पोलिसांना सॅल्यूट करतो. त्यांनी दिल्लीतील वातावरण बिघडू दिले नाही. खरंतर दीपके स्वत:च्या हितासाठी सर्व करत आहेत, असाही आरोप त्यांनी केला.

अभिजीत दीपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी 

तत्पूर्वी, आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनीही अभिजीत दीपके यांचे वडील भगवानराव दीपके यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. एक ज्युनियर इंजिनीअर स्वत:च्या पगारातून मुलाचा अमेरिकेत उच्च शिक्षणाचा खर्च कसा भागवू शकतो? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. कॉक्रोच जनता पार्टीवरील कायदेशीर प्रकरणांसाठी राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी एक कोटी निधी दिला आहे. त्यावरून त्यांनी भारतीय निवडणूक आयोग, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि समी शुल्क मंडळाकडे संपर्क साधलाय. दुसरीकडे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला एक कोटींची नुकसान भरपाई दिलेली नाही, असं म्हणत अभिजीत दीपके यांनी सरकारच्या कारभारावर सवाल उपस्थित केले आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घरच्या घरी पिस्त्याचे झाड लावायचंय? फक्त ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
  • ठाणे मॅरेथॉन: विजेत्यांना मेडल न मिळाल्याने पालकांचा गोंधळ
  • Supriya Sule : चुकीच्या पद्धतीने काढून घेतलेला राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांना परत करा: सुप्रिया सुळे
  • यंदाच्या बाप्पांच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा आणि शुभ मुहूर्त
  • Paithani Saree : पैठणी साडीसाठी आता बारकोड: वस्त्रोद्योग मंत्र्यांनी दिली माहिती, फसवणूक थांबणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in