• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Abhijeet Dipke : अभिजीत दीपकेंना भेटण्यासाठी हायप्रोफाईल व्यक्तींची रांग; माजी मुख्यमंत्र्यांनीही मागितली भेटण्याची वेळ

July 31, 2026 by admin Leave a Comment


कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून तरुणांचं आंदोलन उभारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनाच राजीनामा देण्यास भाग पाडल्याने अभिजीत दीपके हे देशाचे हिरो ठरले आहेत. आंदोलन यशस्वी झाल्यानंतर दीपके छत्रपती संभाजीनगरात आले. त्यांचं जंगी स्वागत झालं. अभिजीत सध्या छत्रपती संभाजी नगरात आहेत. त्यामुळे अभिजीत यांना भेटण्यासाठी नेते, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या रांगा लागल्या आहेत. अनेक व्हीआयपी लोक त्यांना भेटायला येत आहेत. एका माजी मुख्यमंत्र्यानेही त्यांना भेटण्याची वेळ मागितली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये कोकरोच जनता पार्टीचे संचालक अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी मान्यवरांची रिघ लागली आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अभिजीत दिपके यांच्या घरी भेट देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद घडवून आणला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अभिजीत यांच्या आई-वडिलांशी संवाद साधत आंदोलनाच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या, तसेच अभिजीत यांच्या लग्नाबाबतही आपुलकीने विचारपूस केली. या अनौपचारिक संवादाची सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. एवढेच नव्हे तर उद्धव ठाकरे यांनी दीपके यांना मातोश्रीवर येण्याचं आमंत्रणही दिलं आहे. त्यावर मला सर्वांना भेटायचं आहे. मी मातोश्रीवर जरूर येईल, असं दीपकेंनी उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मंत्र्याने घेतली भेट

रविवारी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अभिजीत दीपके यांची भेट घेतली. संजय शिरसाट यांचे दीपके कुटुंबीयांशी जुना घरोबा आहे. या निमित्ताने ते दीपके कुटुंबीयांना भेटायला आले होते. या भेटीनंतर शिरसाट यांनी ही राजकीय नव्हे तर कौटुंबिक भेट असल्याचं म्हटलं. यावेळी त्यांनी दीपके कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आमदाराकडून कौतुक

शिंदे गटाचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी काल अभिजीत दीपके यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. ही वैयक्तिक भेट आहे. मी संघर्षातून आलेला नेता आहे. त्यामुळे दीपके यांची भेट घेण्यासाठी आलो आहे. या भेटीला राजकीय दृष्टीकोणातून पाहू नये, असं त्यांनी स्पष्ट केलं. दीपके यांनी तरुणांच्या भावनांना हात घातला. त्यांचं कौतुक केलं पाहिजे. पण ही भेट राजकीय भावनेतून पाहू नये, असंही त्यांनी म्हटलं होतं.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अँटिलियामधील सिक्यूरिटी गार्डला किती पगार? आकडा ऐकून चक्रावून जाल
  • हा द्रव पदार्थ म्हणजे सापांचा कर्दनकाळच, महिन्यातून फक्त एकदा शिंपडा, पुन्हा आयुष्यात साप दिसणार नाही
  • Akshaye KhannaMahakali : ‘हा धर्म की अधर्म?’ अक्षय खन्नाच्या ‘शुक्राचार्या’चा धडकी भरवणारा अवतार; ‘महाकाली’चा प्रोमो चर्चेत
  • 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा, CA चे हादरवणारे कारनामे उघड; आज करणार कोर्टात हजर
  • साखरेनंतर कांदाही महागला, पण या App वर मिळतोय सर्वात स्वस्त कांदा, 1 किलोची किंमत फक्त…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in