• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Abhijeet Dipke: अभिजीतच्या नियतीमध्ये खोट, राजा सारखा वागतोय… CJPच्या सदस्याच्या आरोपाने मोठी खळबळ

August 8, 2026 by admin Leave a Comment


केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरात कॉकरोच जनता पार्टी चर्चेचा विषय ठरली आहे. या पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपकेंचे आता पुढचे पाऊल काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आता सीजेपीच्या दोन सदस्यांनी अभिजीत यांच्यावर आरोप करत उपोषण केले आहे. त्यांनी अभिजीत यांच्या नियतीमध्ये खोट असल्याचे म्हटले आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सीजेपीच्या मनीष ब्रह्मभट आणि राहुल पांड्यांचं अन्नपाणी त्याग उपोषण सुरू आहे. दरम्यान, त्यांनी माध्यमांशी बोलताना दीपकेंवर गंभीर आरोप केले आहेत.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, अभिजीतच्या नियतीमध्ये खोट आहे. राजासारखा वागतोय. राजा निर्णय स्वतः घेतो तसा तो वागतोय… निर्णय तरुणांना आणि देशातील आंदोलनात उतरलेल्या व्हॅलेंटियर्सला घेऊन व्हायला हवे. नियत चुकीची असली तरी आम्ही नुकसान होऊ देणार नाही. लोकांनी आवाज उठवलाय, सरकार विरोधात बोलतायत आणि तो आवाज दाबला जाऊ नये म्हणून आम्ही बोलतोय

पुढे त्यांनी अभिजीतवर गंभीर आरोप केले आहे. ते म्हणाले, मी जे ग्रुप बनवले होते त्याच व्हाट्सअप ग्रुप मधून मला बाहेर काढले. बाकी लोकांसोबत आमचा संपर्क होऊ नये म्हणून हे सर्व केले जात आहे. जे व्हॅलेंटियर्स आमच्यासोबत बोलत आहेत त्यांचादेखील ब्रेन वाश करण्याचं काम हे करत आहेत.

शेवटी त्यांनी म्हटले की, तो आम्हाला काही बोलू शकतो मात्र आमचं सत्य लपवू शकत नाही. आम्ही इथे मेलो तरी चालतो पण इथून उठणार नाही आणि आंदोलन करणाऱ्या तरुणांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. देशासोबत पुन्हा अरविंद केजरीवालसारखा धोका आम्ही होऊ देणार नाही. आम्ही व्यासपीठावर नेत्यांसारखं भाषण करू तरुण मार खातील अशी यांची हुकूमशाही सुरू आहे. मी त्यांचा सारखा खोटारडा नाही. मरेल पण इथून उठणार नाही.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in