• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Aashadhi Ekadashi : ‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात दुमदुमला महाराष्ट्र, राज्यभर आषाढी एकादशी उत्साहात

July 25, 2026 by admin Leave a Comment


आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात आनंदाच, उत्साहाचं आणि भक्तीमय वातावरण पहायला मिळत आहे. आज पहाचे पंढरपुरात मुख्यमंत्र्याच्या हस्ते विठूरायाची महापूजा पार पडली. पाऊस पडू दे, पीक बहरू दे, पांडुरंगा, महाराष्ट्र समृद्ध होऊ दे, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. तर राज्याच्या विविध भागातही आज आषाढी एकादशीचा मोठा उत्साह पहायला मिळत असून विविध ठिकाणी मदिरात मोठी गर्दी झाली आहे. विठूरायचे दर्शन घेण्यासाठी देवळात भाविकांची मांदियाळी जमली असून अनेक शहरांत,गावात पालखी, दिंडीचे आयोजन करून विठूनामाचा जयघोष करण्यात आला. सकाळपासूनच आज सर्वत्र भक्तीमय, उत्साहाचे वातावरण दिसत आहे.

सावंतवाडीतील माजगाव आषाढी एकादशी निमित्त शेतात साकारली ६० फुटी भव्य विठ्ठल मूर्ती

आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथे भक्ती आणि कलेचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे. कुडाळ येथील डॉ. अनिकेत निब्रे यांनी आपल्या शेतामध्ये नदीतील दगड-गोटे आणि रानफुलांचा वापर करून तब्बल ६० फुटांची भव्य विठ्ठल मूर्ती साकारली आहे. निसर्गाच्या कुशीत उभी राहिलेली ही आकर्षक कलाकृती भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत असून, आषाढीच्या निमित्ताने पंचक्रोशीत श्रद्धा आणि कौतुकाचा विषय ठरली आहे. विठुरायाचे हे लोभस रूप पाहण्यासाठी भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने येथे भेट देत आहेत.

पंढरपूर : चंद्रभागा तीरावर भाविकांचा महासागर

आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आणि चंद्रभागा नदीत पवित्र स्नानासाठी लाखो वारकरी व भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. संपूर्ण पंढरपूर नगरी विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमली असून चंद्रभागा तीर आणि प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

डोंबिवली : टाळ-मृदुंगाच्या गजरात रंगले रवींद्र चव्हाण

आषाढी एकादशीच्या निमित्ताने डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात हरिओम रेल्वे प्रवासी भजन मंडळातर्फे भव्य भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गेल्या १२ वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या या उपक्रमाला यंदाही वारकरी, प्रवासी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजप प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून टाळ-मृदुंग वाजवत भजनात सहभाग घेतला. विठ्ठल नामाच्या गजराने आणि अभंगांच्या सुरांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. वारकरी परंपरा, भक्ती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाने डोंबिवलीकरांचे विशेष लक्ष वेधून घेतलं.

नागपूर : विठ्ठल मंदिरांमध्ये भक्तीचा उत्साह

तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने नागपूर जिल्ह्यातील विविध विठ्ठल मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. निर्मल नगरीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. पहाटेपासून काकड आरती, महापूजा आणि प्रसादाचे आयोजन करण्यात आले असून “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला. रंगीबेरंगी सजावट, पारंपरिक पूजा आणि हरिनामाच्या गजरात नागपूरकर विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत आहेत.

रत्नागिरी : विठुरायाच्या नामघोषात दिंडी उत्साहात

आषाढी एकादशीच्या निमित्ताने रत्नागिरी शहरात पारंपरिक दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिर असा दिंडीचा मार्ग असून भगवे झेंडे, टाळ-मृदुंगाचा गजर आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात महिला, पुरुष आणि वारकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. पारंपरिक वेशभूषेतील वारकऱ्यांनी भक्तिमय वातावरण निर्माण केले.

रायगड : धाकटी पंढरी साजगाव येथे भाविकांची मोठी गर्दी

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध “धाकटी पंढरी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साजगाव येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले असून “विठ्ठल… विठ्ठल…” या नामघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. टाळ-मृदुंगाच्या गजरात अभंग आणि भजन म्हणत वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहिले. मंदिर प्रशासनाने दर्शनरांग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली होती. पंढरपूरला जाता न आल्याची खंत असली तरी साजगावच्या धाकट्या पंढरीत दर्शन घेण्याचे भाग्य लाभल्याची भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली.

मुंबई : वडाळ्यातील प्रति पंढरपूरात महापौर ऋतू तावडे यांच्या हस्ते अभिषेक

आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुंबईतील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळा येथील विठ्ठल मंदिरात पहाटे मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांच्या हस्ते सहकुटुंब अभिषेक पूजा संपन्न झाली. परंपरेनुसार मुंबईच्या महापौरांना या मंदिरात पूजेचा मान दिला जातो. यावेळी त्यांचे पती राजेश तावडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. मुंबईच्या महापौर या नात्याने वडाळ्यातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठलाची पूजा करण्याचा बहुमान मिळाल्याने मन भरून आलं.सर्व मुंबईकर आणि वारकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा असं महापौर तावडे म्हणाल्या.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in