• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात

July 22, 2026 by admin Leave a Comment


आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली असून राज्यातील अनेक भाग जलमय झाले आहेत. गेल्या 24 तासांत पूराशी संबंधित विविध घटनांमध्ये 21 जणांचा मृत्यू झाला असून, लाखो नागरिकांना या आपत्तीचा फटका बसला आहे.

असम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून शिवसागर, डिब्रुगढ, जोरहाट, गोलाघाट, चराईदेव, धेमाजी, तिनसुकिया, नगाव, बिस्वनाथ, कामरूप आणि कार्बी आंगलाँगसह एकूण 16 जिल्हे पुराच्या विळख्यात सापडले आहेत. या पूरामुळे राज्यातील 5.64 लाखांहून अधिक नागरिक प्रभावित झाले आहेत.

गेल्या 24 तासांत पूर आणि त्यासंबंधित दुर्घटनांमध्ये 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक 13 मृत्यू शिवसागर जिल्ह्यात नोंदवले गेले आहेत. प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना मदत देण्याबरोबरच बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू केले आहे.

पूरामुळे राज्यातील 872 गावं पाण्याखाली गेली असून हजारो कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. अनेकांनी मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला असून, घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागांतील रस्ते संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दरम्यान, पुराचा मोठा फटका शेतीलाही बसला आहे. 24 हजार हेक्टरहून अधिक शेतीक्षेत्र पाण्याखाली गेले असून भातासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून बाधित भागात मदतकार्य सुरू असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आम्ही जिंकलो असतो पण तो आडवा आला… शुभमन गिलने कोणाला व्हिलन ठरवलं? सरळ नाव घेत म्हणाला की..
  • Nepal Flood: नेपाळच्या महापुरातून थोडक्यात बचावला अभिनेता; जिथे 12 तासांपूर्वी फोटो काढले, तिथेच आला महाप्रलय
  • रात्र सरताच दिवसा तरंगायला लागले मृतदेह, भूतनाथ तलावात भयंकर प्रकार; 5 दिवसापूर्वी घडलं असं काही की… लोकांमध्ये एकच भीती!
  • ज्याची भीती तेच घडले, नेपाळमधून हादरवणारी माहिती, 392 जणांचा मृत्यू, 1200 हून अधिक बेपत्ता, महाराष्ट्रातील..
  • IND vs SL: भारतीय संघाचं काम सोप केलं, संधीचं सोनं केलं, तरीही रिकाम्या हाताने घरी जावं लागलं, पडिकलमुळे झाला ‘गेम’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in