• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

90 किमी ताशी वेगाने वारे धडकणार, 17 राज्यात इशारा, महाराष्ट्रात मॉन्सून दाखल, थेट इशारा..

June 7, 2026 by admin Leave a Comment


केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मॉन्सून पुढे सरकत आहे. तळकोकणापर्यंत मॉन्सून पोहोचला आहे. मॉन्सून तळकोकणात असला तरीही देशातील अनेक राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावताना दिसतोय. यादरम्यानच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. 7 जून रोजी पुढील 12 तासांत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, केरळ आणि तामिळनाडू यांच्यासह तब्बल 17 राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याच अंदाज आहे. यादरम्यानच ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र, लडाख, झारखंड,ओडिशा, केरळ, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, अंदमान आणि निकोबार बेटे, गोवा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, माणिपूर, पुदुचेरी, त्रिपुरा या राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला.

यादरम्यानच नागरिकांना सावध राहण्यास देखील सांगण्यात आले. पावसावेळी जोरदार वादळी वाऱ्याचाही इशारा देण्यात आला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी वेगाने प्रगती करत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू असा बराच मोठा भाग व्यापला आहे. पुढील 7 दिवस या भागात जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाने असाही अंदाज वर्तवला आहे की, पुढचे 2 ते 5 दिवस मोसमी वारे महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिसा या भागात येऊ शकते. सध्याच्या परिस्थितीमध्ये मॉन्सून वेगाने पुढे सरकत आहे. उद्यापर्यंत मुंबईत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या जो पाऊस सुरू आहे, तो अवकाळी पाऊस आहे. आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हा पाऊस हजेरी लावणार आहे.

भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांकरिता पावसाचा अंदाज दिला आहे. यासोबतच वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असताना सुरक्षित स्थळी राहण्याचा नागरिकांना इशारा देण्यात आला. यंदा मॉन्सून देशात दोन दिवस उशिराने दाखल झाला असला तरीही मॉन्सूनची चांगली वाटचाल सुरू आहे. राज्यात मॉन्सूनला पोषक वातावरण असल्याचेही बघायला मिळत आहे. शेतकरी गेल्या काही दिवसांपासून मॉन्सूनच्या पावसाची वाट पाहत आहेत. गोव्यातून तळकोकणात हा मॉन्सून दाखल झाला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Prajakta Mali: प्राजक्ता माळीवरचा ‘फरसाण’ जोक नेमका कुठून आला? हास्यजत्रेच्या अभिनेत्याने सांगितला सेटवरचा भन्नाट किस्सा
  • इराणचा भारताला मोठा दणका, थेट भारताविरोधात पाकिस्तानला मदत, हादरवणारा खुलासा..
  • शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
  • वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
  • Sugar Price Hike: ना सरकारमुळे, ना दुकानदारांमुळे… तर नागरिकांमुळेच वाढले साखरेचे दर, भलतंच कारण आलं समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in