• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

90 किमी ताशी वेगाने चक्रीवादळ, 15 राज्यांवर संकट, IMD चा मोठा इशारा, मॉन्सून..

May 30, 2026 by admin Leave a Comment


राज्यासह देशातील हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. चक्रीवादळासह अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. 30 मे 2026 रोजी उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशसह 15 राज्यांमध्ये पावसासह चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला. पावसासोबत ताशी 90 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह वादळी वारे वाहतील. या काळात लोकांना अत्यंत सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये चक्रीवादळासह पावसाने धुमाकूळ घातला. सहा राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपिटीची शक्यता आहे. उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आणि लगतच्या भागांवर मध्य-ट्रोपोस्फियर स्तरावर चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. मॉन्सून लवकरच देशात दाखल होण्याचे संकेत आहेत. त्यामध्येच अवकाळी पाऊस चांगलाच मोठा धुमाकूळ घालताना दिसत आहे.

राज्यातही उष्णतेची लाट कमी होत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने राज्यातही आज पावसाचा मोठा इशारा दिला. यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि वर्धामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा इशारा दिला.धुळे, नंदुरबार, भंडारा, गोदिंया, गडचिरोली, नागपूर, वाशिम, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला.

वाढलेल्या तापमानापासून विदर्भवासीयांना मिळणार काहीसा दिलासा. गेल्या पंधरा वीस दिवसापासून जे तापमान वाढलं होतं काही जिल्हे रेड अलर्ट ऑरेंज अलर्टमध्ये आले होते. त्या जिल्ह्यातील तापमान सुद्धा काही अंशाने कमी होण्याचा अंदाज आहे. जे तापमान 47 पर्यंत पोहोचल होत ते आता 40 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान उतरण्याची शक्यता आहे.

आज काही जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आणि वादळ वारे येण्याची शक्यता आहे तर काही जिल्ह्यांमध्ये गारपिटची शक्यता सुद्धा व्यक्त केली जात आहे. नागपूर हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळीवाऱ्यासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. हा मोठा दिलासा नक्कीच म्हणावा लागेल. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात सूर्य आग ओकत होता. त्यामध्येच आता पावसाचा इशारा दिल्यानंतर मोठा दिलासा नागरिकांना मिळणार आहे. सकाळपासूनच काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळतंय.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठा दणका! मुंबईत मंत्र्यांच्या फ्लॅटवर थेट कारवाई, उच्चभ्रू टॉवरमधील 128 फ्लॅटवर हतोडा?
  • भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीत फडणवीसांची एंट्री? दिल्ली वाऱ्या वाढल्या
  • मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
  • रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी कारवाई, दिपाली सय्यद, अंधारे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल!
  • रक्षाबंधनावर आधारित सुपरहिट गाणं, 43 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आशा भोसले यांनी दिलेला आवाज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in