• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

6,6,4,4,4,4..! वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वेला दणका, पुन्हा ठोकलं दणदणीत अर्धशतक

July 26, 2026 by admin Leave a Comment


भारताने झिम्बाब्वेविरुद्धची टी20 मालिका खिशात घातल्याने तिसरा सामना औपचारिक आहे. या सामन्यात भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आणि श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी स्वीकारली. वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा ही जोडी मैदानात उतरली. त्यामुळे दोन्ही बाजूने आक्रमक फलंदाजी पाहायला मिळेल असं वाटलं होतं. पण अभिषेक शर्मा या सामन्यातही फेल गेला. त्याने 4 चेंडूंचा सामना केला आणि 2 धावा करून बाद झाला. अभिषेक शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतरही वैभव सूर्यवंशीची आक्रमक बाणा काही थांबला नाही. त्याने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांवर जोरदार आक्रमण चढवलं. वैभव सूर्यवंसीने 31 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार मारत 161.29 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक ठोकलं. यासह त्याच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे.

वैभव सूर्यवंशीने नोंदवला विक्रम

वैभव सूर्यवंशीने यापूर्वीच पहिल्या टी20 सामन्यात 15 वर्षे 118 दिवस वय असताना अर्धशतक झळकावलं होतं. असं करत त्याने सचिन तेंडुलकरचा सर्वात तरुण खेळाडू म्हणून अर्धशतकाचा विक्रम मोडीत काढला होता. आता दुसरे अर्धशतक ठोकत त्याने या वयात हा पराक्रम करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. 15 वर्षे 121 दिवस वय असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले दुसरे अर्धशतक ठोकले आहे. 15 व्या वर्षी टीम इंडियात पदार्पण करून आंतरराष्ट्रीय मालिकेत दोन वेळा 50 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. वैभव सूर्यवंशीने इंग्लंड दौऱ्यात पदार्पण केलं होतं. पण तिथे खेळलेल्या तिन्ही सामन्यात फेल गेला होता. मात्र झिम्बाब्वे दौऱ्यात त्याची बॅट चांगलीच तळपली आहे.

16 वर्षे पूर्ण करण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन अर्धशतक करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी नेपाळच्या कुशल मल्लाने 16 वर्षे पूर्ण होण्याआधी एक अर्धशतक ठोकलं होतं.  दुसरीकडे, वैभव सूर्यवंशी पहिल्या पाच सहा आंतरराष्ट्रीय सामन्यांनंतर वैभवचा स्ट्राईक रेट 211 पेक्षा जास्त राहिला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मोजक्या चेंडूंमध्ये इतक्या वेगाने धावा कुटणारा तो एकमेव युवा फलंदाज ठरला आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sneha Wagh : कौटुंबिक हिंसाचार, दोन घटस्फोट, स्नेहा वाघ आता तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात? अखेर मनातलं बोलूनच दाखवलं
  • IND vs SL 2nd Test : गौतम गंभीरला तुम्ही कितीही शिव्या घाला पण एकाबाबतीत तो 1 नंबर, कोलंबो टेस्टमध्ये एक निर्णय ठरला मास्टरस्ट्रोक
  • मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
  • Amitabh Bachchan : जगभरात त्यांचे लाखो चाहते, पण बिग बी कोणाचे फॅन ? अमिताभ बच्चन यांची आवडती गझल कोणती ?
  • खवड्या डोंगरावर कुणाल या गोष्टीसाठी पोहोचला, पण आईला झाला उशीर, अन्… मावशीचा खुलासा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in