• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

53 वर्षांचा झाला ‘क्रिकेटचा देव…’, वाढदिवशी चिमुकल्या चाहतीसोबत दिसून आला स्टारडम, Video पाहून म्हणाल…

April 24, 2026 by admin Leave a Comment

Sachin Tendulkar: ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकर यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. मैदानावर आल्यानंतर आपल्या दमदार खेळाच्या जोरावर सचिन यांनी क्रिकेटप्रेमींच्या हृदयावर राज्य केलं. आज सचिन क्रिकेट खेळत नसले तरी, अनेक नव्या क्रिकेटपटूंसाठी प्रेरणा स्थान आहेत. आज सचिन तेंडुलकर याचा वाढदिवस असल्यामुळे असंख्य चाहते, त्यांच्या घराजवळ जमले. या खास प्रसंगी सचिन यांनी पत्नी अंजली यांच्यासोबत सर्व चाहत्यांची भेट घेतली. पण एका चिमुकलीसोब सचिन आणि अंजली यांची भेट खास ठरली. त्यांचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर असंख्य नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ते आज 53 वा वाढदिवस साजरा करत आहेत. वयाच्या 16 व्या वर्षी सचिन यांनी अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाय ठेवला आणि त्यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही… 24 वर्षांच्या करियरमध्ये सचिन यांने वेगवेगळ्या मैदानांवर अनेक विक्रम रचले आणि क्रिकेटचे देव झाले… 1998 च्या हॅरिस शील्ड स्पर्धेत सचिन आणि त्यांचा मित्र विनोद कांबळी यांनी केलेल्या ऐतिहासिक 664 धावांच्या भागीदारीमुळे सचिन यांच्या प्रतिभेला पहिल्यांदा खरी ओळख मिळाली. मुंबईच्या आझाद मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सचिन यांनी 326 धावा केल्या आणि कांबळी 349 धावांवर नाबाद राहिला. त्यावेळी, क्रिकेटच्या इतिहासातील कोणत्याही स्तरावरील ही सर्वोच्च भागीदारी होती.

 

VIDEO | Mumbai: Cricket icon Sachin Tendulkar greeted fans gathered outside his residence to celebrate his 53rd birthday. Sachin and his wife Anjali Tendulkar shared a light moment with a ‘little fan’ on the occasion.#SachinTendulkar #Mumbai

(Full video available on PTI Video… pic.twitter.com/j6u71JgAUP

— Press Trust of India (@PTI_News) April 24, 2026

एका पंचाच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचली कहाणी…

सचिन यांनी रचलेले रेकॉर्ड जगासमोर यायला फार मोठा काळ लागला. प्रतिष्ठित क्रिकेट मासिक ‘विस्डेन’ने ते प्रसिद्ध केलं नाही. पण पंच मार्कस कुटो यांच्या अथक परिश्रमामुळे, ही ऐतिहासिक भागीदारी एका महिन्यानंतर जगासमोर आली. त्यांनी धावफलकातील चूक दुरुस्त केली आणि नोंदींची योग्य मांडणी केली, तरीही सचिन आजही गंमतीने आठवण करून देतात की, तीन धावा कमी पडला होत्या.

सचिन तेंडुलकर यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आकडेवारीच्या

टेस्ट : 200 सामने, 15921 रन, 51 शतक

वनडे: 463 सामने, 18426 रन, 49 शतक

अंतरराष्ट्रीय शतक: 100 (जगात ऐकटेच)

विकेट: 201

सांगायचं झालं तर, सचिन तेंडुलकर यांनी 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या वानखेडे कसोटीत आपल्या सुवर्ण कारकिर्दीला निरोप दिला. पण आजही सचिन तेंडुलकर अनेकांसाठी प्रेरणास्थानी आहेत.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारतापुढे सर्वात मोठं संकट, एका निर्णयामुळे हजारो कोटी बुडणार… 60 टक्के व्यापार संकटात?
  • Video: ‘अरे क्यूट बॉय, जरा इकडं बघ की’ वैभव सूर्यवंशीवर कोण इतकं फिदा? त्यानं मग केलं काय?
  • Tourist spots in Uttarakhand : मे महिन्यात उत्तराखंडला जाणार असाल तर हरिद्वारपासून 2 तासावर असलेल्या या स्वर्गासारख्या जागेला नक्की भेट द्या
  • Aishwarya Rai: बिल गेट्सना कंपनी विकणाऱ्या श्रीमंत व्यक्तीची बायको असती ऐश्वर्या पण…, 5 सेलिब्रिटींसोबत होते प्रेमसंबंध
  • आप पक्षात महाभूकंप, राघव चड्ढासह 7 खासदार भाजपात; देशाच्या राजकारणात मोठी खळबळ!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in