• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन; व्हिडिओ व्हायरल

July 23, 2026 by admin Leave a Comment


मुंबई पोलिसांच्या एका कर्मचाऱ्याचा धमकीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. व्हिडिओमध्ये एक पोलीस तरुणाला धमकावताना दिसत असून, “पुन्हा दिसलास तर 50 ग्रॅमची पावडर टाकेन” असे कथित वक्तव्य करताना तो ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

आज झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या व्हायरल व्हिडिओचा उल्लेख करत मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या मोबाईलवर हा व्हिडिओ आला असून, एका टॅक्सीतील तरुणांना पोलीस अशा प्रकारे धमकावत असल्याचे त्यात दिसत आहे.

राज ठाकरे म्हणाले, “50 ग्रॅमची पावडर टाकेन, असे म्हणणारा पोलीस स्वतः ड्रग्स सप्लायर आहे का? पोलिसांकडे अशी पावडर कुठून आली? हे नेमकं काय सुरू आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई केली आहे. पवन सांगळे असे त्या पोलिसाचे नाव असून, तो सायन पोलीस ठाण्यात चालक म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. व्हायरल व्हिडिओनंतर त्याला निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसच्या शिष्टमंडळानेही या प्रकरणावरून पोलीस महासंचालकांची भेट घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संबंधित पोलिसाला निलंबित करण्याची मागणी केली होती. त्यांनी या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त किंवा विद्यमान न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करत, पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

या घटनेमुळे मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या प्रकरणाच्या पुढील चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • डोळ्यासमोर साक्षात मृत्यु, महाप्रलयात जीव मुठीत धरून कुटुंब…. ती दृश्य पाहून काळजाचा उडेल थरकाप, Video पाहिला का?
  • रक्षाबंधननिमित्त किशोरी पेडणेकर, चित्रा वाघ महापौरांच्या निवासस्थानी; स्वामींना बांधणार राखी
  • MNS On Marathi Sakti | ऑटो-टेक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ; मनसे आक्रमक
  • Kriti Sanon: तेरा कुत्ता टॉमी.. क्रितीवर टीका पण स्वत: मात्र, कुनिकाने कंगनाला सुनावलं
  • Kangana Ranaut : देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो… कंगनाची रामदेव बाबांसाठी खास पोस्ट, भाऊ म्हणून उल्लेख; असं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in