• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

5 लाख 24 हजार लोक संकटात, 763 गावं पाण्याखाली…. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सलमान खान पुढे, पदार्थांपासून सॅनिटरी पॅड्सचं कसं करतोय वाटप?

July 29, 2026 by admin Leave a Comment


Assam Floods : आसाममध्ये आलेल्या पुरामुळे सर्वत्र प्रचंड हाहाकार पाहायला मिळत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, पुरात पुरात 68 जणाचं प्राण गेले असून, 5 लाख 24 हजार लोक संकटात आहेत. तर 763 गावं पाण्याखाली आहेत. आलेल्या या मोठ्या संकटामुळे शहरं पाण्याखाली गेली असून, पुरात अडकलेल्या लोकांच्या बचावासाठी आणि मदतीसाठी अनेक ठिकाणाहून मदत पोहोचवली जात आहे. अभिनेता सलमान खान देखील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आला आहे.

मदतीसाठी पुढे आला सलमान खान…

सलमान खान याच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी या सुपरस्टारने आसाममधील आपल्या एका फॅन क्लबशी हातमिळवणी केली आहे. ही मदत त्याच्या ‘बीइंग ह्युमन’ (Being Human) या एनजीओमार्फत पोहोचवली जात आहे. या उपक्रमाची सुरुवात बिस्किटे, गूळ, मुरमुरे आणि ब्रेड यांसारख्या ‘रेडी-टू-ईट’खाद्यपदार्थांच्या वाटपाने झाली. एवढंच नाही तर, सॅनिटरी पॅड्सचं देखील वाटप करण्यात येत आहे.

 

The floods in Assam is worsening. Lakhs of people have been displaced and hundreds of bodies of humans and animals are flowing with the flood water.

Pray for Assam 💔🙏🏻 pic.twitter.com/XTqM208Z1w

— Sayantika (@SayantikaSays) July 26, 2026

 

सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही, जेव्हा सलमान खान गरजूंच्या मदतीसाठी पुढे आला आहे. याआधी देखील त्याने अनेकांची मदत केली आहे. यापूर्वीही अनेक प्रसंगी भाईजानने संकटात सापडलेल्यांना मदत केली आहे. गेल्या वर्षी पंजाबच्या अनेक भागांत मुसळधार पावसामुळे पूर आला होता, ज्यामुळे अनेकांची पिके आणि घरे उद्ध्वस्त झाली होती; त्यावेळीही सलमान मदतीसाठी पुढे आलेला…

सलमान खान याच्यानंतर अन्य बॉलिवूड सेलिब्रिटी येत आहेत पुढे…

पुरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी निधी एकत्र करण्यासाठी बॉलिवूड पुढे आलं आहे. 25 जुलै रोजी, आसामी गायक पापन याने विशाल ददलानी, दिव्या कुमार आणि निलोत्पल बोरा यांच्यासमवेत इन्स्टाग्रामवर एका ‘लाइव्ह चॅरिटी कॉन्सर्ट’चं आयोजन केलं आणि सुरू असलेल्या मदतकार्यासाठी योगदान देण्याचं आवाहन प्रेक्षकांना केलं. पुरामुळे सुमारे 7 लाखांहून अधिक लोक बाधित झाले असून, राज्यभरातील बचाव आणि पुनर्वसन कार्यात मदत करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी आणि मानवतावादी संस्था एकत्र आल्या आहेत.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शरीरातील या 5 लक्षणांकडे बिलकूल दुर्लक्ष करु नका, तात्काळ घ्या डॉक्टरांचा सल्ला
  • महापौरांचं मारवाडी भाषेत स्वागत, मनसेचा संताप, भर कार्यक्रमात थेट… नेमकं काय घडलं?
  • सहा वर्षांपासून ओटीटीवर गाजतेय ही सीरिज; 3 सीझन्स, 33 एपिसोड्स अन् IMDb रेटिंगही तगडी
  • नकोच बाबा, त्याच्यासारखं मला अजिबात खेळायचं नाही… ऋषभ पंतबद्दल ध्रुव जुरेलने असं विधान का केलं?
  • Abhijeet Dipke : सीजेपीमध्ये मोठा उलटफेर, अभिजीत दीपकेंचा निर्णय काय? कुणाला दिली कोणती पदं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in