• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

38 हजार रुपयांची नोकरी सोडून थेट सुरु केली चहाची टपरी, आज महिन्याची कमाई पाहून सर्वच थक्क

July 21, 2026 by admin Leave a Comment


Viral News : आजच्या धावपळीच्या जीवनात आणि मर्यादित पगाराच्या नोकरीत अनेक जण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहतात. मात्र सुरक्षित नोकरी सोडून व्यवसायात उतरण्याचे धाडस फार कमी लोक करतात. अशाच एका तरुणाची प्रेरणादायी कथा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी सोडून त्याने रस्त्याच्या कडेला चहाची टपरी सुरू केली आणि आज त्यातून तो महिन्याला लाखोंची उलाढाल करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अंकित पांडे नावाच्या एका वापरकर्त्याने आपल्या शेजाऱ्याची ही कथा शेअर केली आहे. त्यानुसार, संबंधित तरुण एका कंपनीमध्ये काम करत होता. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 अशी नोकरी करून त्याला दरमहा सुमारे 38 हजार रुपये पगार मिळत होता. मात्र मर्यादित पगारवाढ, करिअरमध्ये कमी संधी आणि वाढता खर्च यामुळे तो असमाधानी होता. त्यामुळे त्याने मे महिन्यात नोकरीचा राजीनामा देत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

दोन लाखांची गुंतवणूक

नोकरी सोडल्यानंतर संबंधित तरुणाने सुमारे 2 लाख रुपयांची गुंतवणूक करून एका ऑटो स्टँडजवळ आकर्षक चहाची टपरी सुरू केली. व्यवसाय सुरळीत चालावा यासाठी त्याने चहा बनवणे आणि ग्राहकांना सेवा देण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केली.

त्याच्या टपरीवर साधा चहा 10 रुपयांना तर प्रीमियम चहा 20 रुपयांना विकला जातो. अंकितच्या पोस्टनुसार, या टपरीवर दररोज सुमारे 400 कप चहा विकला जातो. त्यातून दररोज सुमारे 6 हजार रुपयांची विक्री होते. म्हणजेच महिन्याची एकूण उलाढाल जवळपास 1.8 लाख रुपयांपर्यंत पोहोचते.

महिन्याला 1 लाखांचा नफा

दुकानाचे भाडे, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर दैनंदिन खर्च वजा केल्यानंतरही संबंधित तरुणाला दरमहिना सुमारे 1 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळत असल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. म्हणजेच पूर्वीच्या नोकरीच्या तुलनेत त्याचे उत्पन्न जवळपास तिप्पट वाढल्याचे सांगितले गेले आहे.

Today my neighbour rang my doorbell and handed me a box of sweets.

We hardly meet because of our busy schedules.

A few months ago, he was working at Teleperformance, earning around ₹38,000 a month.

In May, he resigned.

Everyone thought he was making a mistake.

Instead, he…

— Ankit Pandey (@iamankitpande) July 18, 2026

व्यवसाय चांगला चालू लागल्यानंतर त्याने आपल्या टपरीवर वडापाव, समोसे आणि जलेबी यांसारखे लोकप्रिय खाद्यपदार्थही विक्रीस ठेवले आहेत. त्यामुळे ग्राहकांची संख्या वाढली असून व्यवसायातून मिळणारे उत्पन्न आणखी वाढल्याचे पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

डिस्क्लेमर: ही माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील व्हायरल पोस्टवर आधारित आहे. या दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नसून, संबंधित आकडेवारी किंवा माहितीची अधिकृत पुष्टी उपलब्ध नाही.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in