• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

38 जणांना फाशी, 11 जणांना जन्मठेप, साखळी बॉम्बस्फोटातील दोषींची शिक्षा कायम; हायकोर्टाचा मोठा निर्णय

July 7, 2026 by admin Leave a Comment


गुजरात हायकोर्टात 2008 साली झालेल्या अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणावर सुनावणी झाली. या प्रकरणातील 49 दोषींची शिक्षा कायम ठेवली. विशेष न्यायालयाच्या निकालाविरोधात दोषींनी केलेल्या याचिका हायकोर्टाने निकाल दिला. विशेष न्यायालयाने 38 जणांना फाशीची शिक्षा, 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. हायकोर्टाने तीच शिक्षा कायम ठेवली.

न्यायमूर्ती ए. वाय. कोगजे आणि समीर दवे यांच्या खंडपीठाने विशेष न्यायालयाच्या आदेशाविरोधात दाखल याचिका फेटाळून लावली. या प्रकरणात दहशतवादी संघटनेतील सदस्यांना सुनावलेली शिक्षा कायम ठेवली.

20 ठिकाणी 21 बॉम्बस्फोट

26 जुलै 2008 साली अहमदाबादमध्ये अवघ्या 70 मिनिटांत 20 वेगवेगळ्या ठिकाणी 21 बॉम्बस्फोट झाले होते. या घटनेत 56 जणांचा मृत्यू झाला होता. तर 200 जण जखमी झाले होते. या स्फोटाने संपूर्ण गुजरात हादरलं होतं. या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटन हरकत-उल-जिहाद-अल इस्लामी संघटनेने स्वीकारली होती. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ माजली होती.

38 जणांना फाशीची शिक्षा

फाशीची शिक्षा, जन्मठेपाची शिक्षा मिळालेल्या आरोपींनी विशेष कोर्टाच्या निकालाला गुजरात हायकोर्टात आव्हान दिलं होतं. या याचिकेवर हायकोर्टाने आज मंगळवारी निर्णय दिला. दरम्यान, दिल्ली (Delhi) नोव्हेंबर 2025 रोजी लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास सुरू आहे. एनआयएने या प्रकरणी स्फोटात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या शरीरांच्या अवयवांशी संबंधित फॉरेन्सिक रिपोर्ट दाखल केला आहे. एनआयएच्या माहितीनुसार, कारमध्ये झालेल्या स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. स्फोटामुळे अनेकांच्या संपत्तीचं मोठं नुकसान झालं होतं.

विशेष न्यायाधीशांसमोर केलं होतं हजर 

एनआयएने (NIA) 9 आरोपींना विशेष न्यायाधीश पीतांबर दत्त यांच्यासमोर हजर केलं. आरोपींची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली. आता कोर्ट या प्रकरणाची 13 जुलै रोजी सुनावणी घेणार आहे. एनआयएने डॉ. शाहीद सईद , 10 आरोपींविरोधात आधीच आरोपपत्र दाखल केलं आहे. झमीर अहमद अहंगर, तुफैल अहमद भट यांच्याविरोधात दाखल असलेले पुरवणी आरोपपत्र हे एनआयए कोर्टात विचारधीन आहे. दोन्ही आरोपींना फेब्रुवारी 2026 रोजी अटक करण्यात आली होती.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in