• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

29 ऑगस्टला घरासमोर एकही गाडी ठेवू नका, राज्यातील सर्व मराठ्यांनी…,सोलापुरातून जरांगे पाटील कडाडले

August 8, 2026 by admin Leave a Comment


मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सध्या पश्चिम महाष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘समज गैरसमज नको,आम्ही इशारा सभा कोठेही लावलेल्या नाहीयेत, सोलापूर जिल्ह्यात लावली असती तर रस्ते सगळीकडून भरलेले दिसले असते. आम्ही फक्त गावखेड्यातल्या लोकांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतोय,  आणि जे सत्य आहे ते समाजाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये नुकसान सर्वांचं आहे, यामध्ये फक्त गरीब मराठ्यांचे नुकसान नाहीये, तर यामध्ये भाजप,शिवसेना,काँग्रेसमध्ये असलेल्या मराठा बांधवांचं देखील नुकसान आहे.  व्हॅलीडिटी रद्द करण्यात येत आहेत, आणि मी हे समाजाला दाखवून दिलं आहे, असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, मी समाजाच्या हित बघितलं, रक्त जाळून जाळून 58 लाख नोंदी दिल्या. यांना माहीत आहे की जरांगे पाटील पक्क आरक्षण देतोय, मात्र त्यांना आरक्षण द्यायचं नाही. सरकारने आता एक कट रचला आणि गैर समज पसरवला आहे.   नियोजित कट रचला, 4 प्रमाणपत्र रद्द केले, असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान 29 ऑगस्टपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर देखील त्यांनी यावेळी मराठा समाजाला आवाहान केलं आहे.  मराठ्यांनो घर सोडायला शिका. 29 ऑगस्ट ला घरासमोर एकही गाडी राहू नये, राज्यातील सर्व मराठ्यांनी आंतरवालीत या, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये असलेल्या मराठ्यांनी माझी चूक सांगावी,  संजय शिरसाठ यांनी फोन करून कुणबी प्रमाणपत्र रद्द करायला सांगितलं, यात मी चुकीचं काय बोललो? घोडके नावाच्या व्यक्तीची व्हॅलिडीटी झाली आणि बहिणीची रद्द झाली यात मी चुकीचं काय बोललो? सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या लेकीबाळींच वाटोळ करायला लागलेत म्हणून मी बोलतोय, मी याबाबतचे पत्र सुद्धा आणले आहे, असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in