शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान सोलापुरातील खासगी पोलीस प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवणाऱ्या प्रकाश पवार याला अटक करण्यात आली आहे. भिवंडी पोलिसांच्या विशेष पथकाने सोलापुरातून ही कारवाई केली. प्रकाश पवार हा सोलापुरातील कुमठे गावात ‘ध्रुव प्रतिष्ठान’ या नावाने खासगी पोलीस प्रशिक्षण केंद्र चालवत […]
Archives for August 2026
धीरज परदेशींची हत्या कपाळावरील भगव्या टिळ्यामुळे, आमदाराचा आरोप; सीएमच्या फोननंतर माघार
सागर शिंदे, टीव्ही 9 मराठी : अहिल्यानगर मनपाचा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण अहिल्यानगरमध्ये संतापाचं वातावरण पसरलं आहे. धीरज परदेशी यांच्या कपाळावरील टिळ्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केला होता. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. परदेशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनाकडून काल अहिल्यानगर शहरात बंदची हाक देण्यात […]
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच… कोर्टात नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या वादाची सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. 2023 मध्ये आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना मानत पक्ष आणि चिन्ह दिले होते. या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. […]
IND vs SL: कसोटी मालिकेत श्रीलंकेला गुरनूर ब्रारची सर्वाधिक धास्ती! त्याचं कारण असं की…
भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असून इथल्या खेळपट्ट्या या फिरकीला मदत करणाऱ्या आहेत. त्यामुळे फिरकीचा सामना करण्यासाठी टीम इंडियाने कसून सराव केला आहे. दुसरीकडे, भारतीय फिरकी गोलंदाज श्रीलंकन फलंदाजांना फिरकीवर नाचवण्यास सज्ज झाले आहेत. तर वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराजच्या हाती असणार आहे. पण असं असताना जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत गुरनूर ब्रारचं नाणं खणखणीत वाजेल असं श्रीलंकेचा […]
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण… अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
भारत-चीन सीमेवरील परिस्थिती पुन्हा चर्चेत आली आहे. अरुणाचल प्रदेशातील लष्करी हालचाली आणि सैनिकांमधील चकमकींबाबत विचारलेल्या प्रश्नांवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट भूमिका मांडली आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर म्हणजेच LAC वर शांतता आणि स्थिरता राखणे अत्यंत आवश्यक असल्याचे भारताने म्हटले आहे. सीमेवरील परिस्थितीचा थेट परिणाम भारत आणि […]
गाईला मिळाला तब्बल 2 लाख 21 हजारांचा विक्रमी भाव… डीजेच्या तालावर मिरवणूक काढत शेतकऱ्याचा गाईला निरोप
अहिल्यानगरच्या मानोरी गावातील तरुण शेतकऱ्याची गाय तब्बल 2 लाख 21 हजार रुपयांना विकली गेली आहे.. या गायची दूध देण्याची क्षमता 40 लिटरपर्यंत असल्याचं सांगीतलं जातंय.. विक्रमी किंमत मिळाल्याने या गाईला, डीजेच्या तालावर मिरवणूक काढून वाजत गाजत निरोप देण्यात आला.. मानोरी गावात निघालेली गाईची मिरवणूक चर्चेचा विषय ठरतोय. डीजेचा दणदणाट.. ग्रामस्थांची गर्दी.. गाईची पूजा.. फुलांचा हार […]