काही दिवसांपूर्वी मालाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याची एक धक्कादायक घटना घडली होती. या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता. या पार्श्वभूमीवर मालाड येथील जैन समाजाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी आणि शिष्टमंडळाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. घडलेल्या प्रकाराबाबत जैन समाजाच्या वतीने राज ठाकरे यांना लेखी […]
Archives for June 2026
पठानों से कहना, चौहान आ रहा है..; अजय देवगण करणार ‘धुरंधर’चा खेळ खल्लास?
बॉलिवूड इंडस्ट्रीवर गेल्या काही महिन्यांपासून रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटांचाच बोलबाला पहायला मिळाला. या दोन्ही चित्रपटांनी मिळून बॉक्स ऑफिसवर हजारो कोटी रुपयांची कमाई केली. त्यापूर्वी शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटानेही जबरदस्त गल्ला जमवत सर्वांना थक्क केलं होतं. आता शाहरुख खान आणि रणवीर सिंह या दोघांनाही मात देण्यासाठी अभिनेता अजय देवगणने […]
ANC सपोर्ट आणि 54 तासांपर्यंतच्या बॅटरी लाईफ असलेला वनप्लसचा ‘हा’ नवीन इअरबड्स भारतात लाँच
वनप्लसने ग्राहकांसाठी त्यांचे नवीन वनप्लस नॉर्ड बड्स 4 इअरबड्स सादर केले आहेत. यातील प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये 52dB पर्यंत ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) सपोर्ट, मोठे टायटॅनियम-कोटेड डायनॅमिक ड्रायव्हर्स, एआय-आधारित भाषांतर फिचर्स आणि ब्लूटूथ 6.1 यांचा समावेश आहे. बॅटरी लाईफबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीचा दावा आहे की हे नवीन इअरबड्स एकदा चार्ज केल्यावर 54 तासांपर्यंत बॅटरी लाईफ देतात. चला […]
घटस्फोटानंतर ईशा देओलच्या आयुष्यातून रोमान्सच हरवला; म्हणाली “चुका होतात पण..”
ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मोठी मुलगी ईशा देओलने 2024 मध्ये पती भरत तख्तानीला घटस्फोट दिला. लग्नाच्या अकरा वर्षांनंतर हे दोघं विभक्त झाले होते. घटस्फोटानंतर दोन्ही मुलींचं संगोपन हे दोघं मिळून करत आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ईशा तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. घटस्फोटानंतर आयुष्यात रोमान्स आणि प्रेमाची कमतरता जाणवत असल्याची […]
तुम्हाला काय वाटतं वर दोन गुजराती बसले म्हणून काही करू शकता? आमच्या नादाला… राज ठाकरेंचा जैन समाजाच्या शिष्टमंडळाला इशारा
नुकताच मालाडमधील जैन समाजाकडून राज ठाकरेंची भेट घेण्यात आली. यावेळी काही पदाधिकारीही उपस्थित होते. जैन समाजाच्या पांढऱ्या पट्ट्यावरून राजकारण तापत आहे. यादरम्यानच जैन समाजाकडून राज ठाकरे यांची भेट घेण्यात आली. तुम्ही पांढऱ्या पट्ट्या मारून विनाकारण वाद निर्माण करत असल्याचे राज ठाकरे यांनी जैन समाजाला म्हटले. राज ठाकरे यांनी म्हटले की, तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून […]
Inflation: अमेरिकेत महागाई पण झळ बसतेय भारताला; सोनं-चांदी, शेअर मार्केट सगळ्यांवर होणार परिणाम, मध्यमवर्गीयांचे हाल होणार
अमेरिकेतील महागाईने विक्रम मोडले आहेत. महागाई 4.0% वर पोहोचली असून, ती गेल्या तीन वर्षांतील सर्वोच्च पातळी आहे. आखाती युद्धाचा परिणाम अमेरिकेत जाणवला, ज्यामुळे महागाई वाढली. अमेरिकेतील ही महागाई केवळ त्याच्या सीमांपुरती मर्यादित राहणार नाही. भारतावरही याचा परिणाम होईल. अमेरिकेतील या महागाईचा परिणाम शेअर बाजार, सोने आणि चांदी सुटू शकणार नाहीत. अमेरिकेच्या कामगार विभागाच्या ‘ब्युरो ऑफ […]