• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

20 हजारांपेक्षा कमी किमतीत लाँच झालेल्या ‘या’ 5G फोनवर मिळणार 1 हजार 500 रूपयांची इन्स्टंट डिस्काउंट

July 25, 2026 by admin Leave a Comment


20 हजारांपेक्षा कमी किमतीत लाँच झालेल्या ‘या’ 5G फोनवर मिळणार 1 हजार 500 रूपयांची इन्स्टंट डिस्काउंट

iQOO कंपनीने iQOO Z11 Lite 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात 20 हजार रूपयांपेक्षा कमी सुरुवातीच्या किमतीत लाँच केला आहे. मिड-रेंज सेगमेंटमध्ये लाँच झालेला हा नवीनतम 5G फोन, कंपनीच्या Z10 Lite 5G चे अपग्रेड आहे. हा फोन मिडनाईट ब्लू आणि सोलर फ्लेम या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. या फोनच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये AI-पॉवर्ड फीचर्स, मोठी बॅटरी आणि हाय-रिफ्रेश-रेट डिस्प्ले यांचा समावेश आहे. हा हँडसेट तीन रॅम आणि स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये AI कॅप्शन आणि AI क्रिएशन यांसारख्या फीचर्सचाही समावेश आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनची किंमत आणि फिचर्स तसेच उपलब्धतेबद्दल जाणून घेऊयात.

iQOO Z11 Lite स्मार्टफोनची भारतातील किंमत

iQOO स्मार्टफोनची किंमत 4GB रॅम आणि 128GB व्हेरिएंटसाठी 19 हजार 499 रूपये आहे पण लाँच ऑफर्सनुसार तुम्ही हा फोन 17 हजार 999 रूपयांमध्ये खरेदी करू शकता. तसेच 6GB रॅम आणि 128GB व्हेरिएंटची किंमत 21 हजार 499 रूपये आहे, पण लाँच ऑफरचा भाग म्हणून तुम्ही हा फोन 19 हजार 999 रूपयांमध्ये खरेी करू शकता आणि टॉप-एंड 6GB रॅम आणि 256GB व्हेरिएंटची किंमत 24 हजार 499 आहे. लाँच ऑफर्समध्ये हा स्मार्टफोन 22 हजार 999 रूपये आहे.

लाँच ऑफरमध्ये ॲक्सिस बँक आणि एसबीआय कार्ड व्यवहारांवर 1 हजार 500 रूपयांची त्वरित सूट, तसेच तीन महिन्यांपर्यंतच्या नो-कॉस्ट ईएमआय पर्यायांचा समावेश आहे. हा फोन 30 जुलै रोजी दुपारी 12 वाजता कंपनीच्या वेबसाइट, ॲमेझॉन, विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स आणि निवडक रिटेल आउटलेट्सवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

iQOO Z11 Lite 5G वैशिष्ट्ये

प्रोसेसर: हा मिड-रेंज फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 चिपसेटद्वारे समर्थित आहे, ज्याचा AnTuTu स्कोअर 579,000 पेक्षा जास्त आहे.

बॅटरी : या फोनमध्ये 6500mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर 80 तासांपर्यंत सलग गाणं ऐकण्याचा दावा केला जातो. तसेच या फोनमध्ये 44W फास्ट चार्जिंग, रिव्हर्स चार्जिंग आणि बायपास चार्जिंग 2.0 सारखी वैशिष्ट्ये देखील आहेत.

कॅमेरा: या फोनमध्ये मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा सोनी प्रायमरी सेन्सर, सोबतच 0.08-मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि सेल्फीसाठी 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

डिस्प्ले: या फोनमध्ये 6.74-इंचाचा एचडी एलसीडी डिस्प्ले आहे, तुम्हाला हा हँडसेट 1200 निट्सच्या कमाल ब्राइटनेस आणि 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह मिळेल.

रॅम: 6 जीबी रॅम, 6 जीबी व्हर्च्युअल रॅम आणि 256 जीबी इंटर्नल स्टोरेज आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in