• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

2 वेळा मोडला संसार, मिळाला सर्वात मोठा धोका, तरीही खंबीरपणे उभी ही अभिनेत्री… आता नवी सुरूवात !

July 14, 2026 by admin Leave a Comment


टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर हिचं व्यावसायिक आयुष्य जितके यशस्वी ठरलं, तितकंच तिचं वैयक्तिक आयुष्य अनेक चढ-उतारांनी भरलेलं होतं. प्रेम, विवाह, घटस्फोट आणि नव्याने आयुष्य उभारण्याचा संघर्ष अशा अनेक कठीण टप्प्यांतून जात असूनही दलजीतने कधीच हार मानली नाही. प्रत्येक वेळी ती नव्या उमेदीने उभी राहिली. आता ती अभिनयासोबतच व्यवसायाच्या नव्या क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. ( All Photos : Social Media/ Instgram)

दलजीतने आयुष्यात दोनदा विवाह केला. पहिल्यांदा तिने अभिनेता शालीन भनोटसोबत संसार थाटला होता. काही वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि अखेर त्यांचा घटस्फोट झाला. या नात्यातून त्यांना जेडन नावाचा मुलगा झाला. घटस्फोटानंतर जेडनची संपूर्ण जबाबदारी दलजीतने स्वीकारली आणि एकटीनेच त्याचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला.

दलजीतने आयुष्यात दोनदा विवाह केला. पहिल्यांदा तिने अभिनेता शालीन भनोटसोबत संसार थाटला होता. काही वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि अखेर त्यांचा घटस्फोट झाला. या नात्यातून त्यांना जेडन नावाचा मुलगा झाला. घटस्फोटानंतर जेडनची संपूर्ण जबाबदारी दलजीतने स्वीकारली आणि एकटीनेच त्याचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला.

पहिल्या नात्याच्या वेदनांतून सावरल्यानंतर दलजीतने पुन्हा एकदा प्रेमावर विश्वास ठेवला. 2023 साली तिने केनियामध्ये वास्तव्यास असलेल्या उद्योगपती निखिल पटेलसोबत मोठ्या थाटामाटात विवाह केला. नव्या आयुष्याची स्वप्ने डोळ्यांत साठवत ती मुलगा जेडनसह केनियाला स्थायिक झाली. सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे दिसत असतानाच काही महिन्यांतच तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा मोठं वादळ आलं.

पहिल्या नात्याच्या वेदनांतून सावरल्यानंतर दलजीतने पुन्हा एकदा प्रेमावर विश्वास ठेवला. 2023 साली तिने केनियामध्ये वास्तव्यास असलेल्या उद्योगपती निखिल पटेलसोबत मोठ्या थाटामाटात विवाह केला. नव्या आयुष्याची स्वप्ने डोळ्यांत साठवत ती मुलगा जेडनसह केनियाला स्थायिक झाली. सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे दिसत असतानाच काही महिन्यांतच तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा मोठं वादळ आलं.

लग्नानंतर अवघ्या दहा महिन्यांतच दलजीत आणि निखिल यांचं नातं तुटलं. या संपूर्ण प्रकरणाची बरीच चर्चा झाली. इतकंच नव्हे तर निखिलने दलजीतसोबतचे लग्नच मान्य करण्यास नकार दिल्याचा आरोपही करण्यात आला. या घडामोडींमुळे दलजीतला मोठा मानसिक धक्का बसला. दुसऱ्यांदा वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त झाल्याने ती पूर्णपणे खचली होती. अखेर तिने मुलासह भारतात परतण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा मुंबईत नव्याने आयुष्य सुरू केलं.

लग्नानंतर अवघ्या दहा महिन्यांतच दलजीत आणि निखिल यांचं नातं तुटलं. या संपूर्ण प्रकरणाची बरीच चर्चा झाली. इतकंच नव्हे, तर निखिलने दलजीतसोबतचे लग्नच मान्य करण्यास नकार दिल्याचा आरोपही करण्यात आला. या घडामोडींमुळे दलजीतला मोठा मानसिक धक्का बसला. दुसऱ्यांदा वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त झाल्याने ती पूर्णपणे खचली होती. अखेर तिने मुलासह भारतात परतण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा मुंबईत नव्याने आयुष्य सुरू केलं.

मुंबईत परतल्यानंतर पुनश्च: हरिओम करणं तिच्यासाठी अजिबात सोपं नव्हतं. मात्र संकटांसमोर न झुकता दलजीतने स्वतःला सावरलं. अभिनयासोबतच तिने स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि नव्या संधींचा शोध घेण्यास सुरुवात केली.

मुंबईत परतल्यानंतर पुनश्च: हरिओम करणं तिच्यासाठी अजिबात सोपं नव्हतं. मात्र, संकटांसमोर न झुकता दलजीतने स्वतःला सावरलं. अभिनयासोबतच तिने स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि नव्या संधींचा शोध घेण्यास सुरुवात केली.

आता दलजीतने आपल्या करिअरमध्ये आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ती चांदीच्या दागिन्यांचा व्यवसाय सुरू करत असून सध्या तिचे संपूर्ण लक्ष हा व्यवसाय यशस्वी करण्यावर आहे. एका मुलाखतीत बोलताना तिने स्पष्ट केलं की अभिनय तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आजही आहे. मात्र आता मी केवळ कामाच्या शोधात धावपळ करण्याऐवजी स्वतःचं असं काहीतरी उभे करण्यावर भर देत असल्याचं दलजीतने नमूद केलं.

आता दलजीतने आपल्या करिअरमध्ये आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ती चांदीच्या दागिन्यांचा व्यवसाय सुरू करत असून सध्या तिचे संपूर्ण लक्ष हा व्यवसाय यशस्वी करण्यावर आहे. एका मुलाखतीत बोलताना तिने स्पष्ट केलं की, अभिनय तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आजही आहे. मात्र, आता मी केवळ कामाच्या शोधात धावपळ करण्याऐवजी स्वतःचं असं काहीतरी उभे करण्यावर भर देत असल्याचं दलजीतने नमूद केलं.

मी अभिनय सोडलेला नाही पण आता त्यामागे धावतही नाही. मला वाटतं माझी क्षमता सिद्ध करण्यासाठी मी पुरेसे काम केलं आहे. आता इंडस्ट्रीने मला शोधायला हवे. मी चांदीचा व्यवसाय सुरू करत आहे आणि या नव्या प्रवासाबद्दल मला खूप आशा आहेत. असं दलजीत म्हणाली.  हा व्यवसाय केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी नाही तर भविष्यात मुलगा जेडनसाठी एक भक्कम वारसा निर्माण करण्यासाठी आहे असं तिने पुढे सांगितलं. तिच्या मते हा व्यवसाय तिच्या मुलाच्या भविष्याचा मजबूत पाया ठरू शकतो.

मी अभिनय सोडलेला नाही, पण आता त्यामागे धावतही नाही. मला वाटतं, माझी क्षमता सिद्ध करण्यासाठी मी पुरेसे काम केलं आहे. आता इंडस्ट्रीने मला शोधायला हवे. मी चांदीचा व्यवसाय सुरू करत आहे आणि या नव्या प्रवासाबद्दल मला खूप आशा आहेत.” असं दलजीत म्हणाली. हा व्यवसाय केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी नाही, तर भविष्यात मुलगा जेडनसाठी एक भक्कम वारसा निर्माण करण्यासाठी आहे, असं तिने पुढे सांगितलं. तिच्या मते, हा व्यवसाय तिच्या मुलाच्या भविष्याचा मजबूत पाया ठरू शकतो.

माझा मुलगा जेडन हा माझी सर्वात मोठी ताकद आहे. त्याच्यामुळेच मी आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगावर मात करू शकले. जर मी एकटी असते तर कदाचित खूप आधीच खचून गेले असते. पण एक आई म्हणून माझ्यात प्रचंड ताकद आहे आणि त्याच ताकदीच्या जोरावर मी पुन्हा नव्याने उभी राहिले असं दलजीतने सांगितलं.

माझा मुलगा जेडन हा माझी सर्वात मोठी ताकद आहे. त्याच्यामुळेच मी आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगावर मात करू शकले. जर मी एकटी असते, तर कदाचित खूप आधीच खचून गेले असते. पण एक आई म्हणून माझ्यात प्रचंड ताकद आहे आणि त्याच ताकदीच्या जोरावर मी पुन्हा नव्याने उभी राहिले” असं दलजीतने सांगितलं.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in