• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

13 किलो सोने… 1.62 कोटी नगद… भिंत फोडताच बाहेर आले घबाड… आरटीओ अधिकारी….

July 10, 2026 by admin Leave a Comment


Former RTO Officer Corruption: आधी बेड उघडला… मग सोफा आणि अखेरीस भिंत फोडताच माजी प्रादेशिक परिवहन अधिकारी ललित कुमार आणि आरटीओ कार्यालय एक्स्पोज झाले. या छाप्यात यंत्रणांनी आतापर्यंत 13 किलो सोने, 1.62 कोटी नगद हस्तगत केली आहे. त्याच्या इतर ठिकाणच्या मालमत्तांची मोजदाद अजूनही सुरूच आहे. त्याच्याकडे गुंतवणुकीची इतकी कागदपत्रे सापडली आहेत, की काही न करता त्याच्या 70 पिढ्या आरामात खातील. पण त्यापूर्वीच या भ्रष्ट अधिकाऱ्यावर उत्तर प्रदेश सतर्कता विभागाने (Vigilance Wing) छापा टाकला आणि त्याचे काळे कारनामे हाती लागले. त्याच्या संपत्तीवर टाच आणण्यासाठी तातडीने प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आली आहे. तर या भामट्याने ही कमाई कशी आणि कुठून केली. त्याचे इतर साथीदार कोण याचा तपास व्हिजिलन्स पथक करत आहे. या कारवाईने इतर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. त्याच्या कार्याकाळातील सर्व अधिकाऱ्यांवर विभागाचा वॉच आहे.

घरात जागोजागी सीसीटीव्ही आणि हाय सिक्युरिटी

ललित कुमार या भामट्याने याघरात जागोजागी सीसीटीव्ही आणि हाय सिक्युरीटी यंत्रणा कार्यरत ठेवली होती. त्याची ही सजगतचा त्याचे घबाड बाहेर काढण्यासाठी कारणीभूत ठरली. त्याच्या घरात काही ठिकाणीच ही यंत्रणा लावण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर यंत्रणांनी त्याच्या घराच्या भिंती फोडल्या, सोफा आणि बेड फोडला. त्यात मोठे घबाड हाती लागले. त्याने हे धन लपवण्यासाठी घरातच खास सोय केली होती. या गुप्त ठिकाणी तिसरा डोळा लावल्याने तो अडचणीत आला. त्याच्या घरातून इतका माल जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. आरटीओ विभागातील भ्रष्टाचार आणि अधिकाऱ्यांची खाबूगिरी पुन्हा चर्चेत आली.

एक साधी तक्रार नि आढळले घबाड

व्हिजिलन्स अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ललित कुमार यांच्याविरोधात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याची एक साधी तक्रार मिळाली होती. त्यानंतर तक्रारींचा ओघ वाढला. सुरुवातीला बाहेरून गोपनीय पद्धतीने माहिती गोळा करण्यात आली. प्राथमिक चौकशीत ललित कुमारविरोधात आणि त्याच्या बँकेतील व्यवहारातून काही धागेदोरे आणि भक्कम पुरावे हाती लागले. विशेष न्यायालयाकडून शोध वॉरंट घेतल्यानंतर एकाचवेळी व्हिजिलन्स पथकाने अनेक ठिकाणी छापे टाकले. त्याच्याकडील संपत्ती पाहून अधिकारी सुद्धा चक्रावले. हाती लागलेली मालमत्ता गुंतवणुकीपेक्षा कमी मानली जात आहे. या अधिकाऱ्याने त्याच्या नोकरीच्या कार्यकाळात किती माया जमावली हे पाहून अधिकारी थक्क झाले. या अधिकाऱ्याने लोकलाज सर्व खुंटली टांगल्याचे उघड झाले.

तक्रारीपासून सुरुवात, पण प्रकरण निघाले अधिक मोठे

व्हिजिलन्स अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ललित कुमार यांच्याविरोधात उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमा केल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून येत होत्या. सुरुवातीला गोपनीय पडताळणी करण्यात आली. प्राथमिक चौकशीत आरोपांना पाठिंबा देणारे पुरावे मिळाल्यानंतर विशेष न्यायालयाकडून शोध वॉरंट घेण्यात आले आणि एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले.

तपास अधिकाऱ्यांना इतकी मोठी रक्कम आणि घबाड हाती लागण्याची शक्यता नव्हती. सुरुवातीला झडती घेण्यात आली. त्यात काही विशेष हाती लागले नाही. पण जेव्हा घरातील काही भागात विशेष कप्पे आढळले. महाराजा सोफा, मोठे बेड आढळले. तेव्हा अधिकाऱ्यांना संशय गेला. सीसीटीव्हीचा रोखही अधिकाऱ्यांच्या लक्षात आला. त्यानंतर या वस्तूंमध्ये मोठे घबाड सापडले. त्याचवेळी एका खास भिंतीने अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. भिंतीवर थाप मारल्यावर ती पोकळ असल्याचे जाणवले. फोडल्यानंतर सोन्याचा पाऊस पडला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in