• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

127 किलोचा क्रिकेटर, एकाहाती कॅच पकडून वर्ल्डकप गाजवला; तो सध्या काय करतो ?

July 14, 2026 by admin Leave a Comment


2007 च्या वनडे वर्ल्डकपचं नाव चजरी काढलं तरी त्या आठवणी भारतीय क्रिकेट चाहत्यांन नकोशा वाटतात. ती स्पर्धा खेळाडूंसाठी अत्यंत निराशाजनक तर ठरलीच, पण भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठीही तो वर्ल्डकप फार सुखद नव्हता. मात्र याच वर्ल्डकप स्पर्धेत बरमूडाच्या ड्वेन लेवरॉकने घेतलेला एक अविश्वसनीय झेल आजही क्रिकेटरसिकांच्या सम्रणात असेल. 19 मार्च 2007 रोजी भारत आणि बरमूडा यांच्यात झालेल्या सामन्यात लेवरॉकने स्लिपमध्ये झेपावत रॉबिन उथप्पाचा एका हाताने अप्रतिम झेल टिपला होता. वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वोत्तम झेलांमध्ये या कॅचचा आजही आवर्जून उल्लेख केला जातो. विशेष म्हणजे, सुमारे 127 किलो वजन असलेला लेवरॉक हा त्या काळातील सर्वाधिक वजनदार आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंमध्ये गणला जायचा. मात्र, एवढं वजन असूनही तो जबरदस्त चपळ होता. एका हाताने पकडलेला तो अप्रतिम कॅच, त्याचं जितजागतं उदाहरण होता. 14 जुलै 1971 रोजी बरमूडामध्ये जन्मलेल्या या खेळाडूचा, ड्वेन लेवरॉकचा आज 55 वा वाढदिवस आहे.

‘The big man, the fridge has opened!’

लेवरॉकने झेल घेताच समालोचक डेव्हिड लॉयड यांनी केलेली “The big man, the fridge has opened!” ही कॉमेंट्री प्रचंड गाजली होती. क्रिकेट चाहत्यांमध्ये ही ओळ आजही लोकप्रिय आहे. झेलानंतर लेवरॉकने केलेला जल्लोषही तितकाच चर्चेचा विषय ठरला आणि तो एका रात्रीत जगप्रसिद्ध झाला. एवढंच नव्हे तर याच सामन्यात त्याने क्रिकेटपटू युवराज सिंगलाही बाद केले होते. मात्र, त्याने टाकलेल्या 10 षटकांत 96 धावा झाल्या. भारताने हा सामना तब्बल 257 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. तरीही टीम इंडियाला गट टप्प्यातूनच स्पर्धेबाहेर पडावे लागले, तर दुसरीकडे श्रीलंका आणि बांगलादेशने सुपर-8 फेरीत प्रवेश केला.

बरमूडासाठी 34 विकेट्स

ड्वेन लेवरॉक याने बरमूडाकडून 32 वनडे सामने खेळत तब्बल 34 विकेट्स घेतल्या. तसेच त्याने दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही संघाचे प्रतिनिधित्व केले. ‘स्लगो’ या टोपणनावाने तो सहकाऱ्यांमध्ये प्रसिद्ध होता.

आता काय करतो ड्वेन लेवरॉक?

एप्रिल 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ड्वेन लेवरॉक याने पुन्हा मूळ व्यवसायाचा मार्ग स्वीकारला. सध्या तो बरमूडामध्ये कारागृह अधिकारी (जेलर) म्हणून कार्यरत आहे. याशिवाय तो वेळोवेळी क्रिकेट कॉमेंट्रीही करत असतो. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही बरमूडामध्ये त्याची लोकप्रियता कायम असून, 2007 वर्ल्ड कपमधील तो ऐतिहासिक झेल आजही त्यांच्या नावे ओळखला जातो.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in