• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ॲल्युमिनियम फॉइल पेपरमध्ये अन्न पॅक करणे आरोग्यासाठी भयंकर घातक, संशोधनात धक्कादायक माहिती, थेट..

July 15, 2026 by admin Leave a Comment


आजकाल अन्न गरम राहण्यासाठी ॲल्युमिनियमच्या फॉइल पेपरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मग ते चिकन आणि भाज्यांचे पाकीट बंद करण्यासाठी असो किंवा ओव्हनमध्ये ठेवण्यापूर्वीही त्याचा वापर केला जातो. सर्वांनाच वाटते की, फॉइल पेपरमध्ये अन्न चांगले राहते. सर्रासपणे त्याचा वापर केला जातो. पण खरोखरच हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? याचा कोणीही विचार करत नाही. सर्वजण वापरत आहेत, म्हणजे आपणही वापरावे, ही सर्वांची भावना असते. या ॲल्युमिनियमच्या फॉइल पेपरवर जी चमकणारी चमक असते, ती रासायनिक प्रक्रिया केल्यानंतरच येते. ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सायन्स’मध्ये 2012 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, ॲल्युमिनियम फॉइल ज्या पदार्थांच्या संपर्कात येते, त्यामध्ये ते हळूहळू ॲल्युमिनियमचे अंश सोडू शकते.

अन्न ॲल्युमिनियम फॉइल पेपरमध्ये ठेवणे सुरक्षित?

अन्न शिजवताना ॲल्युमिनियम फॉइलच्या वापराबाबत जोखीम मूल्यांकन या अभ्यासानुसार, संयुक्त अरब अमिराती आणि इजिप्तमधील रासायनिक अभियंत्यांच्या एका पथकाने दैनंदिन स्वयंपाकादरम्यान फॉइलमधून किती प्रमाणात ॲल्युमिनियम अन्नात उतरते याची चाचणी केली. ज्यामधून धक्कादायक माहिती पुढे आली.

संसोधनात धक्कादायक माहिती पुढे मोठी खळबळ 

त्यांनी टोमॅटोचा सॉस, सायट्रिक ॲसिड, मीठ, ॲपल व्हिनेगर आणि विविध मसाले यांच्या वेगवेगळ्या मिश्रणांपासून मांसाचे सॉस तयार केले. त्यांनी फॉइलच्या माध्यमातून ते ओव्हनमध्ये ठेवले. त्यानंतर, धातूचा काही अंश कमी झाला हे तपासण्यासाठी फॉइलचे मोजमाप केले. स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या साहाय्याने अभ्यास केला आणि अन्नामध्ये किती ॲल्युमिनियम उतरले आहे हे निश्चित करण्यासाठी मास स्पेक्ट्रोमेट्रीचा वापर केला.

ॲल्युमिनियम अन्नात उतरते चाचणी 

धातूचे अंश अन्नात मिसळण्याचे स्पष्ट झाले. अभ्यासानुसार, ॲपल व्हिनेगर वापरून बनवलेल्या सॉसमुळे प्रति व्यक्ती सुमारे 465 मिलिग्राम ॲल्युमिनियम अन्नात मिसळले गेले. म्हणजेच तुम्ही अन्न पॅक करण्यासाठी किंवा गरज करण्यासाठी जो ॲल्युमिनियचा फॉइस पेपर वापरता ते आरोग्यासाठी धोकादायक आहे. शक्यतो अन्न फॉइल पेपरमध्ये पॅक करणे टाळा, कारण त्याचे घटक त्यात उतरत असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in