• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

१९ वर्षानंतर ‘वेलकम’ च्या मजूनभाईचे घोडेवाले टीशर्ट का होतंय व्हायरल?

June 9, 2026 by admin Leave a Comment


साल २००७ रोजी आलेल्या ‘वेलकम’ या चित्रपटातील कॅरेक्टर आजही लोकांना आठवतात. या चित्रपटात अनिल कपूर याने सादर केलेला ‘मजनू भाई’चा रोल अनेकांना आठवत असेल. या चित्रपटात अनिल कपूर याने घातलेले घोड्याच्या पेटिंग्सवाले टी शर्टवर सोशल मीडियात आजही अनेक मीम्स फिरत असतात. पण मजेदार गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर काही जणांना तसाच नजारा पाहायला मिळाला. याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या मजेदार व्हिडीओला पाहून लोकांना हसू रोखता येत नाहीए…

सोशल मीडियावर लोक व्यक्त होत आहे की ‘मजनू भाई’ विचारांनी किती पुढे होते. त्यानी अनेक वर्षांपूर्वी आपल्या पेटिंगमधून जी कल्पना केली होती. आजच्या काळात ती सत्यात उतरली आहे.‘वेलकम’ या चित्रपटात अनिल कपूर सोबत नाना पाटेकर यांचा उदय भाई कॅरेक्टरही प्रचंड हसवणारा होता. या दोन्ही अभिनेत्यांनी कमाल केली होती. दोघांचे कॉमिक टायमिंग प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. आजही लोक अनिल कपूरचे टीशर्ट आणि दोघांची जुगलबंदीवर मिम्स बनवून शेअर करत असतात.

बकरी आणि गाढवाचा मजेदार वीडियो

सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओ एक बकरी आरामात एका गाढवाच्या पाठीवर उभी राहून झाडांचा पाला खात आहे. यावेळी ती तिचा बॅलन्स सांभाळत हिरव्यागार पानांचा फडशा पाडताना दिसत आहे. या युनिक आणि मजेदार व्हिडीओ लोकांना’वेलकम’मधील अनिक कपूर यांच्या मजनू कॅरेक्टरने घातलेल्या टीशर्टची आठवण आली . या चित्रपटात अनिक कपूर याने घातलेल्या टीशर्टमध्ये एक जनावर दुसऱ्या जनावरावर उभे असलेले दाखवले आहे. इंटरनेट युजर्स या व्हिडीओ शेअर करत मजनू भाई किती काळाच्या पुढचा विचार करणारे होते अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करत मजा घेत आहेत.

या चित्रपटाला २० वर्षे झाली असतानाही सोशल मीडियावर या चित्रपटाची क्रेज किती आहे हे समजते. लोक या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स करत आहे. हा चित्रपट कॉमेडी चित्रपट म्हणून प्रचंड गाजला होता.या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले होते. या चित्रपटात अक्षय कुमार, कॅटरीना कैफ, अनिल कपूर, नाना पाटेकर, परेश रावल आणि मल्लिका शेरावत अशी तगडी स्टारकास्ट होती. या स्टार्स लोकांना प्रचंड हसवले होते. या चित्रपटाचे बजेट सुमारे ३० ते ४८ कोटी रुपये होते. या चित्रपटाने ११० ते १२० कोटींची प्रचंड कमाई केली होती. सर्वच कॅरेक्टर लोकांना आजही आठवतात. खास करुन उदय भाई आणि मजनू भाई यांची जुगलबंदी प्रचंड गाजली. आता पर्यंत या फ्रेंचायजीचे दोन चित्रपट आले आहेत. पहिला ‘वेलकम’ (२००७)आणि दुसरा ‘वेलकम बॅक’ (२०१५) आला. दोन्ही चित्रपटानी लोकांना हसवले.

येथे पाहा व्हिडीओ –

 

View this post on Instagram

 

A post shared by Genz BuzzZ (@genzbuzzz.in)

आता येतोय नवा सिक्वल

प्रसिद्ध कॉमेडी सिरीज ‘वेलकम’ पुढचा भाग ‘वेलकम टू जंगल’ साल २०२६ मध्ये सिनेमागृहात झळकणार आहे. यावेळी दिग्दर्शन अहमद खान करणार आहेत. यातही स्टारकास्ट मोठी आहे. लीडमध्ये अक्षय कुमार असून सुनील शेट्टी, परेश रावल, जॅकलीन फर्नांडिस आणि दिशा पटनी सारखे मोठे कलाकार यात आहेत. यावेळी हे कलाकार रसिकांना किती हसवतात हे लवकरच समजणार आहे. लोक या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहात आहेत. या चित्रपटात रवीना टंडन, जॉनी लिव्हर, राजपाल यादव आणि अरशद वारसी सारखे कलाकार आहेत. आता इतर वेलकम सिरीजप्रमाणे हा चित्रपटा गाजणार का हा येणार काळच सांगणार आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in