• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

होर्मुझ आम्ही चालवणार… डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, भारतालाही आर्थिक फटका बसणार

July 13, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता पुन्हा वाढू लागला आहे. होर्मुझचा जलमार्ग हा या तणावाचे कारण आहे. इराणचे या सामुद्रधुनीवर नियंत्रण असल्याने जागतिक तेलपुरवठ्यावर त्याचा मोठा परिणाम झालेला आहे. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा दावा केला आहे. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, ‘अमेरिका लवकरच होर्मुझ सामुद्रधुनीच्या सुरक्षेची आणि संचालनाची जबाबदारी आपल्या नियंत्रणाखाली घेऊ शकते. तसेच या मार्गाच्या सुरक्षेसाठी अमेरिकन सैन्य आता विनामूल्य काम करणार नसून, त्यासाठी विविध देशांकडून मोठा मोबदला आकारला जाईल.’

होर्मुझवर इराण नव्हे, अमेरिका नियंत्रण ठेवणार

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, ‘आम्ही या समुद्री मार्गाची सुरक्षा करू आणि त्याबदल्यात मोठी रक्कम घेऊ. आमच्या सैनिकांचे जीव धोक्यात घालायचे असतील तर त्याचा योग्य मोबदला मिळालाच पाहिजे. या वक्तव्यावरून जागतिक सुरक्षेच्या नावाखाली अमेरिका अनेक देशांकडून अब्जावधी डॉलर आकारण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

इराणवर करार मोडल्याचा आरोप

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर दोन्ही देशांतील कराराचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप केला आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, 18 जून रोजी अमेरिका आणि इराण यांच्यात एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या, मात्र त्यानंतर इराणने त्या करारातील अटींचे पालन केले नाही. पुढे ट्रम्प यांनी इशारा देत म्हटले, आम्ही त्यांच्यावर अतिशय कठोर कारवाई करू शकतो. इराणला आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी संपूर्ण होर्मुझ सामुद्रधुनी आम्ही स्वतः चालवू शकतो.

कोणत्या देशांना पैसे द्यावे लागतील?

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, आम्ही त्या मार्गाचे रक्षण करू, पण त्यासाठी आम्हाला पैसे मिळाले पाहिजेत. त्यामुळे भारत, चीन, जपान, युरोपियन देश तसेच मध्यपूर्वेतून तेल आयात करण्यासाठी होर्मुझ मार्गाचा वापर करणाऱ्या इतर देशांना अमेरिकेकडून सुरक्षा हवी असेल, तर त्यासाठी आर्थिक मोबदला द्यावा लागू शकतो. ट्रम्प यांच्या विधानानुसार, सुरक्षा शुल्क न देणाऱ्या देशांच्या जहाजांच्या संरक्षणाची हमी दिली जाणार नाही.

IRGC मुळे अमेरिकेसमोर मोठे आव्हान

ट्रम्प यांच्या या विधानामुळे इराणवर दबाव आणण्याची नवी रणनीती समोर आल्याचे मानले जात आहे. आतापर्यंत इराणने अनेकदा होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची किंवा तेथून जाणाऱ्या जहाजांना अडवण्याची धमकी देत जागतिक स्तरावर दबाव निर्माण केला आहे. मात्र, अमेरिकेने प्रत्यक्षात होर्मुझ सामुद्रधुनीवर लष्करी नियंत्रण मिळवणे सोपे नाही. कारण या भागावर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स या शक्तिशाली लष्करी दलाचा प्रभाव आहे. हे दल होर्मुझमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप रोखण्यासाठी सक्षम मानले जाते. त्यामुळे अमेरिकेसाठी होर्मुझवर नियंत्रण मिळवणे कठीण असणार आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in