• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

होर्मुजमध्ये भारतीयांवर हल्ला, भारताचा थेट मोठा निर्णय, इराणी..

July 14, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे. होर्मुज खाडीत व्यापारी जहाजांना टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. भारतीय कर्मचारी असलेल्या जहाजावर इराणकडून मोठा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 1 भारतीय कर्मचारी ठार झाला तर काहीजण गंभीर जखमी आहेत. भारताने या हल्ल्याचा निषेध केला. यासोबतच असे हल्ले कोणत्याही परिस्थितीमध्ये सहन करणार नसल्याचे भारताने म्हटले. आता भारताकडून मोठे पाऊले उचलली जात आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने नवी दिल्लीतील इराणी मिशनचे उपप्रमुख मोहम्मद जवाद हुसेनी आणि इतर नेत्यांना बोलावून घेतले. या प्रकरणाची गंभीर चिंता व्यक्त केली आणि यासोबतच घडलेल्या घटनेबद्दल त्यांनी स्पष्टीकरण मागितले. होर्मुज खाडी पार करताना युएईचा झेंडा असलेल्या तेलवाहू जहाजावर IRGC ने घातक मिसाईल हल्ला केला.

या जहाजावर भारतीय कर्मचारी होते. ज्यात एकजण ठार झाले तर इतर भारतीय कर्मचारी गंभीर जखमी आहेत. भारत सरकारने या हल्ल्याचा निषेध करत कडक भूमिका घेतली. इराणकडे थेट उत्तरे मागितली आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात भारताची भूमिका स्पष्ट आहे. युद्ध थांबावे भारत शांततेच्या भूमिकेत आहे. मात्र, भारतीय जहाजांवर मोठे हल्ले होर्मुज खाडीत होत आहेत.

आतापर्यंत भारतीय जहाजांना मोठ्या प्रमाणात टार्गेट होर्मुज खाडीत करण्यात आले. भारताने इराणला उत्तर मागत मोठी चिंता व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालयाने घेतलेल्या बैठकीनंतर उपप्रमुख मोहम्मद जवाद हुसैनी कोणतेही भाष्य न करता बैठकीतून रवाना झाले. इराणी दूतावास कोणत्याही प्रकारचे भाष्य न करता बैठक झाल्यावर निघून गेले.

#WATCH | Delhi: Iranian diplomats including Deputy Chief of Mission (DCM) Mohammad Javad Hosseini, who were summoned by Ministry of External Affairs, over recent attack on merchant vessels in Hormuz, leave from MEA

An Indian sailor was killed, six others were wounded in Iranian… pic.twitter.com/BUTEFblCdO

— ANI (@ANI) July 14, 2026

होर्मुज खाडीत भारतीय जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यामुळे भारत आणि इराणमधील संबंध तणावात आली आहेत. इराण आणि भारताचे संबंध चांगली राहिली आहेत. मात्र, होर्मुज खाडीत भारतीय जहाजांना टार्गेट केले जात आहे. आता भारतीय कर्मचाऱ्यांना याचा थेट फटका बसताना दिसतंय. होर्मुज खाडीतून जाणाऱ्या जहाजांना इराणकडून टार्गेट करण्यात आल्यानेच अमेरिकेने पुन्हा एकदा इराणवर हल्ले करण्यास सुरूवात केली.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in