
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांच्या बिळात पाणी घुसल्यामुळे साप बिळातून बाहेर पडतात. त्यामुळे सर्पदंशाचा धोका वाढतो, बिळातून बाहेर पडलेले साप हे आपल्यासाठी सुरक्षित जागा शोधत असतात. जिथे कोरडी आणि थंड जागा आहे, तसेच पुरेसा अंधार आहे, अशा जागी साप लपून बसतात. अशी जागा जर सापांना तुमच्या घरात मिळाली तर साप तुमच्या घरात देखील घुसू शकतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांपासून बचावाची विशेष काळजी घ्यावी लागते. अनेकांना बाग कामाची आवड असते, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपण बागेत विविध झाडं लावतो, परंतु यातील काही झाडं ही अशी असतात, जी सापांना आमंत्रण देणारी ठरतात. साप हा त्या झाडांना असलेल्या विशिष्ट वासामुळे झाडाकडे आकर्षित होतो, असा काही ठिकाणी गैरसमज असतो. परंतु प्रत्यक्षात तसं काहीही नसतं.
तर या झाडाची नैसर्गिक रचनाच अशी असते की सापाला या झाडाभोवती सुरक्षित वातावरणाची निर्मिती होते. जसं की सापांना निवाऱ्यासाठी ज्या ठिकाणी आद्रता जास्त आहे, तसेच अडचण असेल असे ठिकाणं सुरक्षित वाटतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सतत पाऊस पडत असतो, त्यामुळे काही झाडांभोवती नैसर्गिकरित्या तसं वातावरण निर्माण होतं आणि साप या झाडांकडे आकर्षित होतात, त्यामुळे शक्यतो अशी झाडं घराच्या जवळ लावणं टाळली पाहिजेत.
यापैकीच एक झाडं म्हणजे बांबूचं झाडं. बांबूच्या झाडाला दाट पानं असतात, त्यामुळे या झाडाभोवती नेहमी अडचण असते. तसेच पाला सतत खाली पडत असल्याने जमीन देखील पावसाच्या पाण्यामुळे ओली होत नाही, त्यामुळे सापांना सुरक्षित वातावरणाची निर्मिती होते. अनेकदा साप अंडी घालण्यासाठी अशाच झाडांची निवड करतता. अशा झाडांमध्ये अंडी लपवणं सहज शक्य होतं, अंडी लपवल्यामुळे त्यांचं इतर साप व शत्रू प्राण्यंपासून संरक्षण होतं. त्यामुळे साप अनेकदा बांबुच्या झाडाच्या आसपास अंडी घालतात. त्यामुळे शक्यतो अशी झाडं घरापासून थोडी दूर लावावीत. जर तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याची माहिती तुम्ही सर्पमित्रांना द्या, ते त्याला सुरक्षित आधिवासात सोडतील.
Leave a Reply